मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गून्हा
गेवराई दि 9 ( वार्ताहार ) बीड जिल्ह्यात प्रा लक्ष्मण हाके यांचा नियोजित दौरा होता तसेच या दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेश लागू असतांना गेवराई पोलिस ठाणे हद्दीतील तलवाडा फाटा परिसरात पाच पेक्षा जास्त लोक जमा करण्यात आले तसेस झेंड्याच्या दांंड्याने एक चारचाकी गाडीही फोडण्यात आली आहे तसेच ही घटना (दि 7 रोजी ) घडली आहे या प्रकरणी गेवराई पोलिसांनी नऊ जणांविरोधात गून्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,प्रा लक्ष्मण हाके यांचा दोन दिवसापुर्वी बीड जिल्हा दौरा होता तसेच गेवराईत प्रा लक्ष्मण हाके व आ विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यात मोठा राडा पहायला मिळाला होता तसेच बीड जिल्हाधिकारी यांनी काही दिवसांपुर्वीच आंदोलन तसेच मोर्चे यावर प्रतिबंध घातला असून बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले होते तसेच ( दि 7सप्टेंबर ) रोजी गेवराई पोलिस ठाणे हद्दीतील तलवाडा फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले आणि पुन्हा झेंड्याच्या दांड्याने एकाची चारचाकी गाडी फोडण्यात आली आहे याप्रकरणी गेवराई पोलिसांनी नऊ जणांविरोधात गून्हा दाखल केला असून शुभम शेंडगे,दत्ता चोरमले,अशोक शेंडगे,राजेंद्र शेंडगे,हनूमान मुकूटराव,दत्ता शेंडगे,निळकंठ पंडित,ज्ञानेश्वर धूमाळ,अशी आरोपीची नावे असून या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि खूळे हे करत आहेत.