सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – अमरसिंह पंडित

धम्मपाल सौंदरमल यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

 

गेवराई दि. 8 ( वार्ताहार ) शिवछत्र परिवार परिवारावर विश्वास टाकून गेवराई तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत, त्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन गेवराई शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. कार्यकर्त्याबरोबरच सामान्य माणसांच्या अडचणीच्या काळात उभा राहणार शिवछत्र परिवार आहे. सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करून येणाऱ्या काळामध्ये गेवराई नगर परिषदेत आपली सत्ता आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी केले. गेवराई शहरातील धम्मपाल सौदरमल यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला यावेळी ते बोलत होते.

गेवराई शहरातील धम्मपाल सौदरमल यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला माजी नगरअध्यक्ष महेश दाभाडे,सभापती मुजीब पठाण, गणेश वडघने, प्रभाकर पिसाळ, रविंद्र बोराडे, संतोष सुतार, शामकाका येवले, खाजा मामु, जे.के.बाबुभाई, मनोज हजारे, कृष्णा मुळे, बंटी सौदमल, सय्यद सुभान महादेव सौदरमल, मिलिंद सौदरमल, संतोष कांडेकर, लहुराज लोखंडे,धम्मपाल भोले, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गेवराई शहरातील धम्मपाल सौदरमल यांनी आपले असंख्य कार्यकर्ते भुषण जोगदंड, संदिप खरात, संतोष कांडेकर, भीमा सौदरमल, महादेव सौदरमल, संदीप खरात, मिलिंद सौदरमल, देवा गायकवाड, रवींद्र कांडेकर, सुनील शिंदे, मिलिंद सोनवणे, नितीन सोनवणे, अशोक पाटेकर, बॉबी माटे, यशराज भोले, संकेत बाळू कांडेक,आनिल टेलर, भगवान सौदरमल, अनिल कांडेकर, वसंत शिरसाट, सुरज शिरसाट, प्रमोद कांडेकर, गणेश शिरसाट, विश्वजीत संतोष सौदरमल, सत्यजित सौदरमल, सुमित सौंदरमल, नितीन पोपळभट, इमरान पठाण, विशाल भालशंकर, आप्पा निकम, प्रेम मिरपगार, बंडू वडमारे, पप्पू साळवे, नितीन काजळे, आली शेख, सागर अशोक लांडे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे स्वागत केले.

पुढे बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत विजयसिंह पंडित यांचा पराभव झाला परंतु आम्ही घरात बसलो नाही तर दुसऱ्याच्या दिवशी लोकांमध्ये येऊन कामाला सुरुवात केली. लोकप्रतिनिधीने कायम लोकात राहिले पाहिजे. आम्ही कधीही गटातटाचे राजकारण केले नाही आणि करणारही नाही. लोकांनी विश्वास टाकला आणि मोठा आशीर्वाद देऊन विजयसिंह पंडितांना आमदार केले. मिळालेल्या सत्तेचा वापर आता गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठीच केला जाईल. गेवराई शहरांमध्ये सामान्य माणसांना सुविधा मिळाव्या म्हणून काम करायला सुरुवात केली आहे. पात्र लोकांना मग तो कोणत्याही गटाचा असो त्याला घरकुल मिळवून देण्यात येईल. त्याचबरोबर ग्रामीण भागातही गाय, गोठा, शेततळे आणि घरकुले याबाबत पात्र व्यक्तींना लाभ मिळवून देण्यात येईल. कुणाचीही अडवणूक केली जाणार नाही. गेवराई शहराच्या हद्द वाढीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून पाणी, रस्ते, नाली या सर्व मूलभूत सुविधा लोकांना उपलब्ध करून दिल्या जातील. गेवराई शहराचा सर्व समावेशक विकास झाला तरच गेवराईचे अर्थकारण वाढेल. विकास हा सर्व बाजूने झाला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. रस्त्यावर उभा असणाऱ्या सामान्य माणसालाही आपली सत्ता आहे असे वातावरण मला गेवराई गेवराई शहरात निर्माण करायचे आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करून सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावे धम्मपाल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून मोठा विश्वास आमच्यावर टाकला आहे. शिवछत्र परिवार त्यांचा आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी असंख्य नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *