बीड मधील सहकार संकुलाच्या उभारणीसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद

आमदार विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश, उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांचे मानले आभार

मुंबई, दि.1( वार्ताहार ) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्विकारल्यानंतर बीड जिल्ह्याच्या वैभवात भर पडेल अशा अनेक विकासकामांना त्यांनी मंजुरी दिली आहे. बीड शहरातील सहकार विभागाच्या मालकीच्या जागेत भव्य सहकार संकुलाची इमारत उभी करण्याची मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी ना. अजितदादा पवार यांच्याकडे केली होती. आ. पंडित यांच्या मागणीला दादांनी प्रतिसाद देत दि.4 जून रोजी सहकार संकुलाच्या बांधकामासाठी १४ कोटी 98 लाख किंमतीच्या कामास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली होती. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये या कामासाठी 10 कोटी रुपयांची भरीव तरतुद केल्याबद्दल आ. विजयसिंह पंडित यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत. आ. विजयसिंह पंडित यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बीड शहरात सहकार विभागाला देखणी वास्तू मिळणार आहे.

बीड शहरातील जालना रोड भागात नगर भुमापन क्र.१७९९ मधील सहकार विभागाच्या मालकीच्या जागेत सहकार संकुलाच्या इमारतीचे बांधकाम करावे यासाठी आ. विजयसिंह पंडित यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. सहकार विभागाच्या अधिपत्याखालील दहा क्षेत्रीय कार्यालयांना एकाच इमारतीमध्ये यामुळे जागा मिळणार आहे. एका छताखाली ही कार्यालये एकत्रित आल्यामुळे सर्वसामान्य लोकांना यामुळे सुविधा मिळणार आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्विकारल्यानंतर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या कार्यकाळात बीड शहराच्या वैभवात भर पडेल अशी देखणी वास्तु त्यांच्या कारकिर्दीत उभारली जावी यासाठी आ. विजयसिंह पंडित प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे सहकार संकुल इमारतीच्या बांधकामासाठी 14 कोटी 98 लक्ष रुपयांच्या कामाला दि.4 जून रोजी प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली होती.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी बीड शहरातील सहकार संकुलाच्या इमारत बांधकामासाठी पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये दहा कोटी रुपयांची भरीव तरतुद केली आहे. बीड शहराच्या मध्यवस्तीमध्ये मोक्याच्या ठिकाणी नगर भुमापन क्र.1799 मधील 1515.97 चौ.मिटर जागेवर ना. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आणि देखणी वास्तु उभारण्यात येणार असल्याचे आ. विजयसिंह पंडित यांनी या बाबत माहिती देताना सांगितले. जिल्हा उपनिबंधक कार्यालयासह सहकार विभागाशी संबंधित दहा कार्यालये एकाच छताखाली या माध्यमातून येणार असून त्यामुळे प्रशासकीय कामात सुसूत्रता येऊन सर्वसामान्य नागरीकांना त्याचा लाभ होणार आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी दहा कोटी रुपयांची भरीव तरतुद केल्याबद्दल आ. विजयसिंह पंडित यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *