अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत रेवकीचे असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल
गेवराई दि.28 (वार्ताहार ) गेवराई विधानसभा मतदारसंघातील मौजे रेवकी येथील बीआरएसचे सक्रिय कार्यकर्ते तथा उपसरपंच सुरेश सौंदलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
रेवकी येथील बीआरएसचे सक्रिय कार्यकर्ते तथा उपसरपंच सुरेश सौंदलकरग्रामपंचायत सदस्य सर्वश्री आबासाहेब चोरमले, उमेश अष्टेकर, अशोक कोकरे, ऋषिकेश बांगर, पिंटू घोगे, सर्जेराव टेळे सह भैय्या सजगणे, भाऊसाहेब नरोटे, रवींद्र सौंदलकर, महादेव बाबरे , कल्याण थोरात, सामाजी घोंगडे, सतीश पांचाळ, नवनाथ सोनार, बळीराम टेकाळे, सोनाजी देवडे, राम मासाळ, भाऊराव ढवळे, नारायण सानप, रंगनाथ भावले, रामकिसन सानप, संदीप दहिफळे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत केले.
यावेळी माजी नगरसेवक शांतीलाल पिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर पिसाळ, फुलचंद बोरकर, रिपाई तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गजानन काळे, सरपंच रावसाहेब काळे, रामेश्वर जगताप, माजी सरपंच कचरू बाबरे, कमळाजी यमगर, रोहिदास सौंदलकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...