सर्वसामान्य नागरीकांना सुविधा पुरविण्यासाठी नगर परिषदेने तत्पर रहावे – अमरसिंह पंडित

दोन कोटी रुपये किंमतीच्या विकास कामांचा शुभारंभ

गेवराई, दि. 27 (वार्ताहार ) नगरपरिषदे सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी काम करत असते नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत तसेच व्यापारी वर्गाला देखील सुविधा मिळाल्या पाहिजेत हाच हेतू ठेवून नगरपरिषद काम करत असते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कसलेही राजकारण न करता सर्वसामान्यांच्या आणि व्यापारी वर्गाच्या सेवेसाठी तत्पर राहावे असे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. गेवराई नगर परिषदेच्या वतीने विविध विकासकामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

गेवराई शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीने रुपये 1 कोटी 50 लक्ष रुपये किंमतीच्या व्यापारी संकुल बांधकामाचा तसेच नविन बसस्थानक ते चार्वाक हॉटेल पर्यंत सिमेंट कॉक्रिट नाली बांधकामाचा शुभारंभ जयभवानी कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. यावेळी भवानी बँकेचे चअरमन बप्पासाहेब मोटे, माजी नगराध्यक्ष विनोद सौंदरमल, माजी उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई, माजी नगरसेवक जालिंदर पिसाळ, राधेशाम येवले, कृष्णा मुळे, मंजुर बागवान, विलास सुतार, आवेज शरीफ, सय्यद नजीब, उत्तमराव सोलाने, रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक आतकरे, संजय पुरणपोळे, बंटी सौंदरमल, धमपाल भोले, अ‍ॅड. योगेश पाटील, अ‍ॅड. गौतम कांडेकर, अ‍ॅड. मनोज हजारे, दत्ता दाभाडे, संतोष आंधळे, मानवी हक्क अभियानचे कडुदास कांबळे, मोहसिन बागवान, सुभान शेख, सुभाष गुंजाळ, विलास ठाकुर, दत्ता लाड, संतोष सुतार, वसीम फारोकी, जे.के. बाबुभाई, अक्षय पवार, संदिप मडके, रजनी सुतार, बाबा शेख, राजाभाऊ जवंजाळ, कमलाकर हातागळे, दादासाहेब चौधरी, खालेद कुरेशी, सतिष दाभाडे, विलास निकम, सुनिल सुतार, शाम सुतार, नविद मशायक, सादेक शेख, बाळराजे सोनकांबळे, अन्सारी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूढे बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, गेवराई शहराचे अर्थकारण मजबुत करण्यासाठी शहराला जोडणारे रस्ते झाले पाहिजेत. गेवराई शहराच्या प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *