June 2, 2025

तू आमची वाळू बंद करतो का?म्हणत बंदूक लावून केली मारहान

वाळू माफिया बाळू डाकेसह 5 व ईतर 8 जनांविरूद्ध गून्हा

 

गेवराई दि 29 ( वार्ताहार ) गत दोन दिवसापुर्वी गेवराईत माजी उप सरपंच गणेश वडगणे यांना काहीजना कडून जबर मारहान करण्यात आली होती यामध्ये त्यांचा अपहरणाचा देखील प्रयत्न केला होता तसेच हे प्रकरण वाळूच्या कारणामुळे घडले आहे असा अंदाज होता परंतू हे आता सत्य झाले असून गणेश वडगणे यांनी वाळू माफिया शांतिलाल उर्फ बाळू डाके यासह 14 जनांविरूद्ध गून्हा दाखल केला आहे.

याबाबद सविस्तर माहिती की,फिर्यादी माजी उप सरपंच गणेश वडगणे यांच्या बहिणीच्या दारातून वाळूने भरलेला हायवा गेला व खड्यातले पाणी अंगावर उडाले होते याच कारणा वरूण गणेश वडगणे यांना मारहान करूण त्यांना बंदूकीचा धाक दाखवला व जबर मारहान केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तसेच गेल्या काही महिना भरापासून वाळूची तस्करी सुरू?होती का?व कूनाच्या सांगण्यावरून?पोलिस यांचे वाळूत हात ओले होते का?असाही प्रश्न उपस्थित होत आहे बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी प्रशासनाला धडा शिकवायची मोहिम हाती घेतली आहे पण त्यांच्या आदेशाला खालचे पोलिस कर्मचारी जूमानत नाहीत अनेकांच्या बदल्या कित्येक जणांचे निलंबन तरी देखील यामध्ये फरक पडत नाही ही अवैध धंद्याची साळखी प्रशासनावरच येऊन ठेपते असे म्हणने देखील वावगे ठरणार नाही तसेच गणेश वडगणे यांनी तक्रारीत जो उल्लेख केला आहे तो धक्कादायक आहे यामध्ये तू आमची वाळू बंद करतो का,तूला माहित आहे का?आम्ही वाळू माफिया आहेत अश्या प्रकारे धमकीवजा भाष्य करून सदर प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस अधीक्षक नवनित कॉवत सदर प्रकरणात काय?कार्यवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *