धर्मवीर संभाजीराजे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज पंडित
गेवराई दि.8 (वार्ताहार) गेवराई शहरातील छत्रपती संभाजीराजे मित्र मंडळच्या वतीने आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीची बैठक होऊन धर्मवीर संभाजीराजे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गेवराई तालुक्याचे युवानेते पृथ्वीराज पंडित यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीला दीपक आतकरे,सतीश दाभाडे, विलास ठाकूर, दत्ता दाभाडे शिवनाथ परळकर,अक्षय कालवडे, सोमनाथ गांडुळे, शरद वादे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत कार्यकारिणी घोषित करण्यात आली. उपाध्यक्षपदी सतीश दाभाडे, विनोद सौदरमल, अवेज सेठ, सचिवपदी संदीप मडके, शिन बेद्रे,करण जाधव, सहसचिवपदी राहुल मोटे, किशोर वादे, कार्याध्यक्षपदी समाधान मस्के,महेश मोटे, सहकार्याध्यक्षपदी सोमनाथ गिरगे, बाबू गायकवाड, कार्यकारणी सदस्य म्हणून मुन्ना मोटे, मुकेश महाजन, शाम रुकर, सहकोषाध्यक्षपदी संतोष सुतार,मनोज हजारे, नविदभाई मशायक, विजय तावस्कर, भागवत घोडके यांची निवड करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांचा छत्रपती संभाजीराजे मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आली.