जातीय माणसकीतेतून पुरुषाकडून महिलेस जबर मारहाण;बीड शहरातील घटना 

 

बीड दि 2 ( वार्ताहार )बीड येथील शेजारी राहण्याऱ्या एका पुरूषाणे एका महिलेला जबर मारहान करण्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणात बीड शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे तसेच या मारहानीत सदरची महिला ही गंभीर जखमी झाली असल्याची माहिती असून सदरची महिला ही शासकीय सेवेत देखील असल्याची माहिती आहे तसेच बीड जिल्हात पोलिसांचा वचक राहिला नाही असे या घटनेवरून सिद्ध होत आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की, एकमेकांच्या अगदी समोरा समोर राहत आहेत. परंतु वसंत खेडकर नामक व्यक्ती याच्या डोक्यामध्ये प्रचंड जातीवाद भरलेला आहे आणि याच जातीयवादी मानसिकतेमधून तो कोरडे कुटुंबाला दीड वर्षापासून जाणीवपूर्व व जातीमुळे त्रास देत आहे अंकुश कोरडे हे मागासप्रवर्गातून अनुसूचित जाती समाजातून येतात त्यामुळे तो व्यक्ती त्यांना जाणीवपूर्वक नाहक त्रास देत आहे परंतु कोरडे यांचे कुटुंब उच्च शिक्षित आहेत अंकुश कोरडे हे शिक्षक आहेत तर त्यांच्या पत्नी या एसटी महामंडळ मध्ये वाहक या पदावर कार्यरत आहेत. ते आणि त्यांची पत्नी व दोन मुले यांच्यासह ते या ठिकाणी वास्तव्यास आहेत.

सदरील व्यक्ती त्यांना देत असलेला त्रास ते दीड वर्षापासून खपवून घेत आहेत कारण ते उच्च शिक्षित आहेत त्यामुळे त्यांनी त्याला कुठल्याही प्रकारचे प्रतिउत्तर दिले नाही याच पूर्वसंदेचा फायदा घेत सदरील व्यक्तीने धुमाकूळ घालत दिनांक 30/05/2025 रोजी सायंकाळी ठीक 7.00 च्या दरम्यान सदरची महिला ही आपल्या नियमीत कामा करून घरी आल्या होत्या तेवढ्या वसंत खेडकर हे देखील बाहेरून त्यांचे चारचाकी वाहन घेऊन आला तेव्हा रस्त्यावरती खेळत असलेले कोरडे यांचे लहान मुले यांना तो दमदाटी करू लागला तेवढ्यात ही घाबरलेली मुले त्यांची आई पीडित महिला  यांच्याकडे गेले आणि सांगू लागले की मम्मी शेजारील काका आम्हाला ओरडत आहेत. तेव्हा पीडित महिला बाहेर आली व वसंत खेडकर यांना जॉब विचारू लागली काका काय झाले आहे तेव्हा तो व्यक्ती पीडित महिलेस म्हणाला रोडवरती का मुलांना खेळवता तेव्हा पीडित महिला त्यांना मानाली की काका लहान मुले आहेत ती समजू. सांगा त्यांना असे विचारले असता या व्यक्तीने महिलेस अररेवीची भाषा वापरील व अश्लील भाषेत शिवीगाळ करून बोलण्यास सुरुवात केली घालू का तुझ्या मुलांच्या अंगावर गाडी टाकू का तुझ्या मुलांना मारून तुम्ही महारांची लोक कधी सुधारणार नाहीत खूप मजला आहेत तुम्ही तुम्हाला माझ्याबद्दल काही माहीत नाही असे म्हणत महिलेस त्याने मारण्यास सुरुवात केली एवढ्यावरच न थांबता या व्यक्तीने मुलांस देखील मारहाण केली या माणसाच्या मना मध्ये प्रचंड जातीवाद भरलेला आहे आणि याच मानसिकतेतून त्याने हा प्रकार केला आहे मी इंडियन आर्मी मध्ये नोकरी केलेला माणूस आहे मी कोणालाच घाबरत नाही मी तुझे सर्व कुटुंब मारून टाकेल असे म्हणत तो महिलेस मारत होता सदरील व्यक्ती हा मध्यधूंत अवस्थेस होता वेगवेळ्या प्रकारची नशा तो करून आलेला होता हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर सदरील व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे. महिलेचे पती यावेळी घरी नव्हते याच संधीचा फायदा घेत हा सर्व प्रकार त्या व्यक्ती केला आहे पीडित महिला गंभीर जखमी असून डोक्याला जबर मार लागला आहे साध्य जिल्हा रुग्णालयात पीडित महिलेवर उपचार सुरू आहे.महिलेच्या सांगण्यावरून सदरील व्यक्ती वसंत खेडकर याच्यासह त्याच्या पत्नीवर अनुसूचित जाती जमाती कायद्यासह विविध कलमान्वये शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे परंतु आरोपी अजुनपर्यंत अटक झालेले नाहीत कोरडे कुटुंब व पीडित महिला अत्यंत भयभीत असून सदरील आरोपी अजुनपर्यंत अटक झाले नसून आरोपींना लवकर अटक करावे अशी मागणी पीडित महिलेसह कुटुंब करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *