April 18, 2025

तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित

तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

गेवराई दि 24  (वार्ताहर) तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद असुन अगदी कमी विद्यार्थी संख्येमध्ये ही शाळा सुरू झाली. विकास कोकाटे सरांनी लावलेल्या या छोट्याश्या रोपट्याचे आज वटवृक्षांमध्ये रूपांतर झाले आहे.आपण याचे सर्वजण साक्षीदार आहात. बारा वर्षाच्या कालावधिनंतर शाळेची गुणवत्ता,विद्यार्थी संख्या व शाळेने वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रात देखील नावलौकिक मिळवत आहेत .अशाच प्रकारे विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवत राहावे व आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करावे असे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले.

गेवराई येथील तुळजाभवानी इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी आ. विजयसिंह पंडित हे बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की शाळेची विद्यार्थ्यांची प्रगती अतिशय उत्कृष्ट आहे. अशाच प्रकारे यापुढेही असेच काम करत राहावे जेव्हा कधी शाळेला कुठल्याही कामाची कमतरता वाटत असेल तेव्हा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सदैव पाठीशी राहील असा शब्द यावेळी त्यांनी दिला. तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विकास कोकाटे सर यांचे विशेष कौतुक केले. तसेच यावेळी उपस्थित पालकांना आपण आपल्या पाल्याला मोबाईल पासून दूर ठेवा मोबाईल मुळे मुलांचे नुकसान होत असून मोबाईल पासून दूर ठेवणे काळाची गरज झाली आहे असे मत व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती गेवराईचे आ.विजयसिंह पंडित यांची होती.तसेच भवानी बँकेचे संचालक दीपक तात्या आतकरे, बापूसाहेब तारुकर, दैनिक रिपोर्टरचे प्रतिनिधी भागवत जाधव, बीड राज्यकर्ताचे संपादक अमोल वैद्य ,संपादक अविनाश इंगावले, पालक प्रतिनिधी उमेश चौंडीया यांची उपस्थिती होती. सर्वप्रथ दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व इंटरनॅशनल इंग्लिश ओलंपियाड परीक्षेमध्ये काळे आरती सचिन, काळे सोहम गणेश, काकडे संग्राम दिलीप या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गोल्ड मेडल देण्यात आले व समाजसेवेसाठी सदैव तत्पर असणारे रामेश्वर कचरू भुते यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.सर्वप्रथम मोरया मंगलमूर्ती मोरया, या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जगदंबे, झुबी डुबी, लावणी, गलतीसे मिस्टेक, बाकी सब फर्स्ट क्लास है, दैवत छत्रपती, तुफान, अशी बनवाबनवी ,स्कूल नही जाना है ,नऊवारी साडी, पापा मेरे पापा, कोळीगीत गलतीसे मिस्टेक, नाटक, शेतकरी सॉंग, हम काले हुए तो क्या हुआ, इंडिया वाले, छम्मा छम्मा, इथली माझी बांगडी, माय नेम इज लखन, देसी गर्ल, कॉमेडी गीत आशा विविध गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विकास कोकाटे सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्रुती सोनवणे, श्रावणी गवळी, आदित्य उडान, सिद्धी परळकर, ईश्वरी भुते, संग्राम काकडे, इंद्रजीत होंडे, विद्यार्थ्यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *