परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई

 

बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले आहे, त्यांना पदमुक्त करण्यात आलेला आहे. मागील तीन दिवसांपासून बीडमध्ये परमेश्वर सातपुते आणि स्थानिक राजकारणामध्ये कलह पाहायला मिळत आणि त्यामुळे परमेश्वर सातपुते यांच्या पक्षप्रमुखांनी ही कारवाई केली असल्याची माहिती आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की, परमेश्वर सातपुते यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन काही खुलासे आणि काही नेत्यांवर आरोप केले होते. मारहाणीचा कथित वायरल व्हिडिओ प्रकरणी सरपंच पती दादासाहेब खिंडकर यांच्यावर गुन्हे दाखल होते त्यानंतर दादासाहेब खिंडकर हे पोलिसांना शरण आले त्यानंतर परमेश्वर सातपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अमरसिंह पंडित यांच्यावर आरोप केले.

दादासाहेब खिंडकर यांना अमरसिंह पंडित यांनी बळ दिलं त्यामुळे तो मोठा झाला. स्थानिक पत्रकार भागवत तावरे यांच्या पाठबळामुळे दादासाहेब खिंडकर हा मोठा झाला. त्याचबरोबर देशमुख कुटुंबीयांवर देखील परमेश्वर सातपुते यांनी आरोप केले होते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी ही कारवाई केली आहे. परमेश्वर सातपुते यांना पदावून मुक्त केल्यानंतर उल्हास गिराम यांची त्यांच्या जागेवर प्रभारी नियुक्ती करण्यात आलेली आहे आजच्या दैनिक सामनामध्ये याबाबद अधिकृत वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *