56 फेरफार प्रलंबित ठेवल्या प्रकरणी मंडळ अधिकारी डरपे यांचे निलंबन
जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा दणका
गेवराई दि 6 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यात कार्यरत असतांना आपल्या मंडळातील 56 फेरफार विनाकारण प्रलंबित ठेवल्या असल्याची बाब लक्षात आल्यानंतर मंडळ अधिकारी अशोक डरपे यांना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी चांगलाच दणका दिला आहे त्याचे थेट निलंबन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ( दि 5 मार्च ) काढले असल्याने महसूल विभागात खळबळ माजली आहे.तसेच या प्रकरणी गेवराई तहसिल कार्यलयात जिल्हाधिकारी यांनी बैठक घेतली होती.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई येथे प्रलंबित फेरफार बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.सदर बैठकीमध्ये प्रलंबित फेरफार बाबत मंडळ निहाय आढावा घेण्यात आला असता श्री. अशोक गोरख डरफे,मंडळ अधिकारी, लिंबागणेश, तहसील कार्यलय, बीड यांच्याकडे 56 फेरफार प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे.श्री.अशोक गोरख डरफे यांना सदर प्रलंबित फेरफार बाबत बैठकीमध्ये विचारणा केली असता त्यांनी मोघम स्वरुपाचे उत्तर दिले आहे. बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील देखील प्रलंबित फेरफारची संख्या जास्त असल्याने श्री. अशोक गोरख डरफे, मंडळ अधिकारी, तहसील कार्यलय ,बीड या नावांवार बेरका मधे सूचना 56 फेरफार प्रलंबित गेवराई तालुक्यात ठेवले आहे.त्यामुळे श्री.अशोक गोरख डरफे,मंडळ अधिकारी, लिंबागणेश,तहसील कार्यालय,बीड हे शासकीय कामकाजात अक्षम्य दुलक्ष,कर्तव्यात सचोटी परायनता न ठेवता गंभीर स्वरुपाची बाब आहे, त्यांचे सदरचे वर्तन हे महाराष्ट्रनागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 चे नियम 3 नुसार गैरर्तन ठरते.या नियमानुसार मंडळ अधिकारी अशोक डरपे यांचे निलंबन करण्यात आले असून त्यांना निलंबन कार्यकाळात बीड हे मुख्यालय ठिकाणी हजर राहण्याच्या सुचना देखील जिल्हाधिकारी यांच्या आदेशात देण्यात आल्या आहेत.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...