वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कार्यवाई
आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
गेवराई दि 3 ( वार्ताहार ) गेवराई पोलिस ठाणे हद्दीत नाकझरी परिसरात अवैध वाळू चोरी होत असल्याची माहिती उप विभागीय पोलिस अधीकारी यांच्या पथकाला मिळाल्यानंतर सदर ठिकाणी त्यांनी छापा मारला व दोन ट्रॅक्टरवर कार्यवाई केली असून यामध्ये गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला असून आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई पोलिस ठाणे हद्दीत नाकझरी शिवरात गेल्या आठ दिवसापासून ट्रॅक्टरव्दारे चोरटी वाहतूक सुरू होती तसेच (दि 2 मार्च ) रोजी दूपारी गेवराईचे उपविभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांना गूप्त बातमीदाराने माहिती देऊन कळवले की सदर ठिकाणी वाळूचोरी होत त्यांनी सदर ठिकाणी आपल्या पथकाला सदर ठिकाणी छापा मारण्याच्या सुचना दिल्या तसेच पथकातील चकलांबा पोलिस ठाण्याचे पोउपनि अंनता तांगडे यांनी दोन कर्मचारी यांना सोबत घेऊन नाकझरी गोदापात्रात छापा मारला व एक ट्रॅक्टर पकडले तसेच एका ट्रॅक्टरने पलायन केले तसेच ते दूसरे ट्रॅक्टर गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हे दोन्ही वाहनावर गून्हा दाखल करण्यात आला असून सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांच्या मार्गदर्शनाखीली पोउपनि अंनता तांगडे,सुरवसे पौळ यांनी केली आहे.