वाळूची कार्यवाई करत असतांना एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहान
चकलांबा पोलिसांत गून्हा दाखल
गेवराई दि 2 ( वार्ताहार ) सुरळेगाव व राक्षभूवन परिसरात खाजगी वाहन घेऊन कार्यवाई करत असतानां चकलांबा पोलिस ठाण्याच्या एका कर्मचारी याला सहा वाळू माफियांनी हानमार केली असल्याची गंभीर घटना समोर आली आहे याबाबद चकलांबा पोलिसांत शनिवारी रात्री उशीरा गून्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,चकलांबा पोलिस ठाणेदार संदिप पाटील यांनी फोन करून राक्षसभूवन व सुरळेगाव परिसरात वाळू चोरी जात आहे त्याठिकाणी जाऊन कार्यवाई करावी असे आदेश दिल्यानंतर हनूमान इंगोले हे खाजगी वाहनाने आपल्या सोबत ईतर करमचारी यांना घेऊन गेले तसेच सुरळेगाव परिसरात एक लोडर व एक वाळूने भरलेले ट्रॅक्टर होते तसेच सदरचे दोन्ही वाहन ताब्यात घेत असतांना त्याठिकाणी असनाऱ्या वाळू माफियानी सदर कर्मचारी यांच्या सोबत हूज्जत घातली व त्याला जबर मारहान केली आहे यामध्ये त्यांच्या हाताला गंभीर ईजा झाली असून त्यांच्यावर बीडच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच हे सहा लोक नगर जिल्ह्यातील आहेत व ज्याठिकाणी ही घटना घडली त्यावेळी दोन हायवा देखील चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या हायवा वेगळा गून्हा आणि यावर वेगळा गून्हा दाखल करण्यात आला आहे तसेच एक घटनेचे दोन वेगवेगळे गून्हे दाखल केल्या असल्यामुळे चकलांबा पोलिसांच्या कार्यप्रनालीवर संशय व्यक्त केला जात असून या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.