वाळूच्या दोन हायवावर चकलांबा पोलिसांची कार्यवाई;एक कोटीचा मुद्देमाल जप्त

कार्यवाई दरम्यान एक कर्मचारी यांच्या हाताला ईजा0

गेवराई दि 28 ( वार्ताहार ) तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान सुरळेगाव याठिकाणी अनाधीकृत वाळू चोरी होत असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना मिळाली तसेच त्यांनी सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला व पहाटे पाच च्या दरम्यान सुरळेगाव गोदापात्रात दोन हायवा या कार्यवाई दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्या तसेच या कार्यवाईत एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका कर्मचारी यांच्या हाताला देखील ईजा झाली असल्याची माहिती आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,वाढती गून्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने तसेच कायदा व सुवैस्थेला बाधा आणनाऱ्या ईसम व रेकॉर्डवरील गून्हेगार व अवैध धंंदे यांच्यावर कार्यवाई करण्याच्या सुचना बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी दिलेल्या आहेत त्यांच्या सुचने नुसार चकलांबा पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन केले तसेच चकलांबा ठाणे प्रमुख यांच्यासह चार पथके तयार करण्यात आली होती तसेच एका पथकाला गोपनिय बातमीदाराने कळवले की सुरळेगाव परिसरात वाळू चोरी होत आहे सदर ठिकाणी या पथकाने सापळा लावला तसेच दोन हायवा ताब्यात घेतल्या व वाळू माफिया व पोलिस यांच्यात चकमक देखील झाली यामध्ये एका पोलिस कर्मचारी यांच्या हाताला ईजा झाली तसेच व सदर कार्यवाई दरम्यान कर्मचारी एका ट्रॅक्टर मागे धावत असतांना तो खाली पडला व त्यांच्या हाताला ईजा झाली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली तसेच या कार्यवाईत एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांच्या मार्गदशनाखाली चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि संदिप पाटील,येळे,पौळ,सुरवसे,इंगोले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *