April 18, 2025

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर नप कडून अतिक्रमणावर हातोडा

 

गेवराई दि 24 ( वार्ताहार ) गेवराई शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने असलेल्या अतिक्रमणावर आज गेवराई नगर परिषदेने हातोडा चालविला आहे तसेच गेल्या अनेक वर्षापासून हा अतिक्रणाविषयी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या मात्र आज ( दि 24 रोजी ) गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडूरके यांनी या अतिक्रमणावर कार्यवाई केली आहे.

या बाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई शहर हे राष्ट्रीय महामार्गावर आहे आणि गेल्या विस वर्षापासून याठिकाणी अतिक्रमण आहे तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रणामुळे अपघात तसेच पार्किंग च्या असूविधेबाबद अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या तसेच गेवराई शहरातील या मुख्य रस्त्यावरील अतिक्रण यांना अनेकदा स्थानिक नगर परिषद यांच्या कडून वारवार सुचना देण्यात येत होत्या परंतू अतिक्रण धारक यांच्यावर यांचा काही परिणाम दिसत नव्हता आज मात्र बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या आदेशानंतर गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडूरके यांनी आपल्या पथकासमवेत तसेच पोलिस संरक्षणात या अतिक्रमणावर हातोडा चालविला तसेच राहिलेल्या अतिक्रण धारकांनी तात्काळ अतिक्रण काढावे नसता पुन्हा कार्यवाई करण्यात येईल असा ईशारा नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आला असून या कार्यवाईत किरकोळ व्याप्यारी यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *