April 18, 2025

पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार;मुक्ताराम आव्हाड यांचा आत्म दहनाचा ईशारा 

 

गेवराई दि 13 ( वार्ताहार ): – गेवराई तालुक्यातील नागझरी येथे जलजिवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजने मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार युवा नेते मुक्ताराम आव्हाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना निवेदन द्वारे सखोल चौकशी करुन गुत्तेदार व संबंधित ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असून संबंधित दोषी वर कारवाई न केल्यास पंचायत समिती कार्यालय समोर आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा देखील दिला आहे.

तालुक्यातील नागझरी येथील जलजिवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजने मध्ये खुप मोठ्या प्रमाणावर अपहार झालेला आहे. त्यामध्ये 20 वर्षे जुनी पाण्याची टाकी दाखवुन तसेच पाणी पुरवठा करणारी विहीर देखील जुनीच दाखवली आहे. व त्या जुन्याच कामावर मोजमाप पुस्तीका तयार करुन पाईपलाई सुध्दा बोगस केलेली आहे त्या संबंधीत गुत्तेदार व ग्रामसेवक व इतर संबंधीत लोक यांनी संगणमत करुन मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून सदरील कामाची सखोल चौकशी करुन संबंधीत गुत्तेदार व ग्रामसेवक व इतर लोक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन, झालेल्या अपहाराची रक्कम वसुल करण्यात अशी मागणी युवा नेते मुक्ताराम आव्हाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांच्या कडे करत येत्या 15 दिवसामध्ये संबंधीत प्रकरणामध्ये सखोल चौकशी करुन संबंधीत दोषी गुत्तेदार, ग्रामसेवक व इतर संबंधीत लोकांवर कार्यवाही न केल्यास पंचायत समिती कार्यालय गेवराई समोर आत्मदहन करणार असल्याचे गंभीर इशारा निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *