गत वर्षात वाळूच्या गून्ह्यांची नोंद शंभरी पार;ठाणेदार कागदी घोडे नाचवून एसपींना खूश करू लागले
खूलेआम चालनारे अवैध धंदे आता बिनभोबाट सुरू
गेवराई दि 16 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील चर्चेत असनारी वाळू तस्करी याला काही प्रमाणात लगाम जरी लागला असल्याचा भास जरी होत असला तरी देखील तस्करांनी वेगळी पद्धत वापरून आता सुरूवात केली आहे तसेच गेवराई शहरा लगत आसपास साठे तयार करून त्यांची ट्रॅक्टरव्दारे तस्करी केली जात आहे तसेच गत वर्षी डिसेंबर महिण्या आखेर गेवराई पोलिस ठाणे 50 पेक्षा अधिक चकलांबा 50 पेक्षा अधिक तसेच तलवाडा 50 पेक्षा अधिक वाळू चोरीचे गून्हे दाखल आहेत परंतू यांची या गून्ह्यात प्रगती काय?हा प्रश्न अन उत्तरीत आहे तसेच खूलेआम सुरू असनारे अवैध धंदे आता बिनबोभाट सुरूच आहेत.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,बीड पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी नवनित कॉवत यांनी स्विकारल्या पासून निश्चित अवैध धंदे तसेच गून्हेगारी याला आळा जरी बसला तरी केवळ खालच्या ठाणेदार यांच्याकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याची प्रक्रीया सुरू आहे ही प्रक्रीया फक्त पोलिस अधीक्षक यांना खूश करण्यापुरतीच तर नाहीना?असा प्रश्न सर्व सामान्य यांना पडला आहे तसेच गेवराई तालुक्यात फक्त अवैध वाळू तस्करी चे रोल मॉडेल पुढे करून ईतर धंदे देखील बिनभोभाट सुरू आहेत याकडे पोलिस अधीक्षक यांनी बारकाईने लक्ष केंद्रीत करायला हवे हायवाची तस्करी बंद झाली मान्य आहे पण आजही बिन बोभाट गेवराई तालुक्यात ट्रॅक्टरव्दारे वाळू तस्करी सुरू आहे.अवैध दारू विक्री सुरू आहे गूटखा व्यावसाय सुरू आहे गेवराई शहराच्या लगत असनाऱ्या ठिकाणी पत्ताचे क्लब सुरू आहेत हे सगळे सुरूच आहे फक्त खूलेआम ऐवजी बिन बोभाट सुरू आहे फरक मात्र ऐवढाच आहे गेवराई तालुक्यातील गेवराई,चंकलाबा,तलवाडा याठिकाणी दाखल झालेल्या वाळूच्या गून्ह्यात प्रगती काय?किती जणांविरूद्ध काय?कार्यवाई केली हा प्रश्न अनउत्तरीतच आहे.तसेच न्यायालयातून वाहन सोडल्या नंतर त्यामधिल वाळुचा मुद्देमाल कूठे?जातो तसेच वाहतूक पोलिस मनमानी करून सर्व सामान्य यांना आपल्या मनाने कितीही फाईन मारू लागले केवळ कागदावरच ठाणेदार घोडे नाचवू लागले पोलिस अधीक्षक नवनित कॉवत साहेब या खूश करण्याच्या प्रक्रीयेला लगाम लावा आणि खरी कायदा व सुवैस्था याठिकाणी आबाधित राहिल अशी उपाय योजना करा आपणांकडून अशा प्रकरची आशा सर्व सामान्य नागरिक करत आहेत.