गोदाकाठच्या तलाठ्यानां वाळू बाबद अहवाल सादर करण्याचे निर्देश
तहसिलदार संदिप खोमणे यांनी माफिया विरोधात फास आवळला
गेवराई दि 6 ( वार्ताहार ) तालुक्यातील गोदाकाठच्या तलाठ्यांना आता वाळू उपस्याबाबद माहिती तहसिलदार यांना लेखी स्वरूपात द्यायची आहे याबाबद गेवराई तहसिलदार संदिप खोमणे यांनी असे आदेश काढले आहेत तसेच आता गेवराई महसूलच्या वतिने देखील वाळू माफिया यांच्या विरोधात फास आवळला असल्याचे चित्र आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यात वाळू तस्करी हा कळीचा मुद्दा राहिलेला आहे अनेक महसूल प्रमुखांना यांचा नाहक त्रासही झालेला आहे महसूल व पोलिस पथकांवर मोठ्या प्रमाणात वाळू माफियाकडून हल्ले देखील झाले होते तसेच वाळू बाबद गोदाकाठच्या तलाठी यांनी वाळू चोरी बाबद शासनाकडे अहवाल सादर करण्याची कायदेशीर तरतूद आहे परंतू यांचा काही वेळा दूरउपयोग देखील करण्यात येतो परंतू गेवराई तालुक्यातील गोदाकाठ परिसरातून अनेक तलाठी यांच्या आर्शिवादाने वाळू उपसा केला जातो याला आता लगाम लागणार आहे तसेच गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे यांनी गोदाकाठच्या तलाठ्यांनी वाळू चोरीबाबद लेखी स्वरूपात अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या आहेत यापुर्वी देखील तहसिलदार संदिप खोमणे यांनी 25 वाळू माफिया विरोधात नावानिशी तक्रार दाखल केली होती त्यामुळे आता पुन्हा ऐकदा गेवराई महसूल प्रशासन वाळू माफिया विरोधात मोठी कार्यवाई करण्याच्या प्रक्रीयेत आहे तसेच गोदाकाठच्या तलाठी यांनी खोटी अथवा चूकीची माहिती प्रशासनाला कळवली तर त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणार असल्याचेही महसूल प्रमुख तहसिलदार संदिप खोमणे यांनी सांगितले आहे.