January 22, 2025

आ.विजयसिंह पंडित यांनी केले वैद्य कुटुंबियांचे सांत्वन

गेवराई, 2,( वार्ताहार ) – गेवराई शहरातील कृष्णाई नगर येथील रहिवासी अनिल देविदास वैद्य (वय 58 वर्षे) यांचे शुक्रवार, दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर आमदार विजयसिंह पंडित यांनी बुधवार, दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन वैद्य कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी स्व.अनिल वैद्य यांचे ज्येष्ठ बंधू विलासराव वैद्य, चिरंजीव अक्षय वैद्य, पुतणे साप्ताहिक राज्यकर्ताचे संपादक अमोल वैद्य व अमित वैद्य यांच्यासह वैद्य कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी आमदार विजयसिंह पंडित यांच्या समवेत माजी नगरसेवक राधेश्याम येवले, गोरख शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, वडगाव चे सरपंच सचिन ढाकणे, आमदार पंडितांचे स्वीय सहाय्यक तथा माटेगावचे सरपंच ज्ञानेश्वर माऊली आरबड, सुनील डेंगळे जीवन साळवे आदी आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *