वाळू चोरीच्या उद्देशाने थांबलेल्या दोन सराईत गून्हेगार यांच्यावर पोउपनि तांगडे यांची कार्यवाई
गेवराई दि 23 ( वार्ताहार ) तालुक्यात वाळू चोरी तसेच गून्हेगारी यांच्यात संख्येत वाढ सुरू चाललेली असतांना बीड पोलिस यांची प्रतिमा ढागाळलेली असतांना बीड पोलिस अधीक्षक पदाचा पदभार नवनित कॉवत यांनी स्विकारल्या पासून दोन दिवसांतच पोलिस यंत्रना सतर्क झाली आहे उप विभागीय गस्तीवर असतांना तलवाडा परिसरात दोन सराईतावर पोउपनि अंनता तांगडे यांनी कार्यवाई केली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,तलवाडा परिसरात शिवाजी चौकात विना क्रंमाकाची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडीत दोन ईसम हे थांबले होते तसेच पोलिसांनी त्यांना विचारपुस केली असता त्यांचे उत्तर समाधान कारक आले नाही तसेच संशय बळावल्यामुळे सदरच्या दोन ईसमा विरूद्ध तलवाडा पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला असून या दोघांचाही गून्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तसेच बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी पदभार घेताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे सदरच्या कार्यवाईत दोन लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अंगत दूर्गादास परळकर,व अविनाश मुळीक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक नवनित काॅवत,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू,यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अंनता तांगडे,यांनी केली आहे.