गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन
गेवराई दि 20 ( वार्ताहार ) बीड येथील दैनिक वास्तव चे संपादक जितेंद्र सिरसट यांना जिल्हाधिकारी कार्यलयात कार्यरत असनाऱ्या एका आघाव नामक महिलेनं धमकी वजा भाष्य करून अपमानित केले असल्याच्या निषेधार्थ गेवराई येथील सर्व पत्रकार संघटनाच्या वतिने तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यंमत्री देवेंद्र फडणविस यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,बीड जिल्हाधिकारी कार्यलयात गौणखनिज विभागात कार्यरत असनाऱ्या श्रीमती आघाव यांनी दैनिक वास्तव चे संपादक जितेंद्र सिरसट यांना फोनवर धमकी वजा भाष्य केले तसेच अपमानास्पद वागतून भाष्य केले असल्याची रेकॉर्डिंग संपादक जितेंद्र सिरसट यांनी माध्यमांना दिली तसेच पत्रकार यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आनण्याचे काम या वरील मुजोर कर्मचारी यांनी केली असल्याने या घटनेच्या निषेधार्थ गेवराई येथील सर्व पत्रकार संघटनानी तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना याबाबद निवेदन सादर केले असून या मुजोर कर्मचारी यांच्यावर बडतर्फची कार्यवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष मधूकर तौर,मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मिडीयाचे तालुका अध्यक्ष अविनाश इंगावले,व्हॉईस ऑफ मिडीयाचे तालुका अध्यक्ष विनोद पौळ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अंकूश आतकरे,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे तालुका अध्यक्ष सुभाष सुतार,पत्रकार विनोद नरसाळे,पत्रकार भागवत जाधव,पत्रकार सोमनाथ मोटे,पत्रकार राहूल राका,पत्रकार शेख खाजा,पत्रकार विश्वनाथ काळे,पत्रकार भागवत देशपांडे हे उपस्थित होते.