January 22, 2025

मुप्टाचे क्रांतीबा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 घोषित

पुरस्कार वितरण सोहळा 29 डिसेंबर 2024 रोजी संपन्न होणार

बीड दि 20( वार्ताहार ) महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशनच्या (मुप्टा) वतीने देण्यात येणाऱ्या सन 2024 च्या क्रांतीबा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा जाहीर करण्यात आली असून बीड जिल्हा मुप्टाचे जिल्हाध्यक्ष मा. प्रा. प्रदीप रोडे यांच्या अध्यक्षतेखाली तुलसी इंग्लिश स्कूल, संत ज्ञानेश्वर नगर, बीड.येथे बैठक संपन्न झाली. बीड जिल्हा मुप्टाच्या वतीने क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सर्व समावेशक कृतिशील कर्तृत्व करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव करण्यात येतो. प्रति वर्षी प्रमाणे यावर्षी चे पुरस्कार वितरणाचे 16 वे वर्ष आहे असे पुरस्कार वितरण सोहळ्याचे मुख्य संयोजक व बीड जिल्हा मुप्टाचे अध्यक्ष, प्रा. प्रदीप रोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

शिक्षक प्राध्यापकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव लढाऊ संघटना म्हणून मुप्टाने आपली ओळख निर्माण केलेली आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून संघटनेने सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या संदर्भात त्यांना हवे त्या मदतीचे कार्य करून जणूकाही शैक्षणिक नवक्रांती करण्याचे कार्य मागील अनेक वर्षापासून बीड जिल्हा मुप्टा करते आहे.प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून बीड जिल्हा मुप्टाच्या वतीने सलग 16 व्या वर्षी शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड. येथे सकाळी ठीक 10 वाजता संपन्न होणार आहे.पुरस्कारार्थी- 1. प्रा. डॉ. प्रतिभा जाधव, (आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, लासलगाव,जिल्हा नाशिक.) 2. प्राचार्य भास्कर पाटील,( सुधाकरराव नाईक महाविद्यालय, अकोला.) 3. श्रीमती कीर्तीताई श्रीधरराव पांगरकर (साळुंके), (विनायक प्राथमिक विद्यालय, बीड.) 4. आयु. राहुल कांबळे, (युसुफ वडगाव हायस्कूल, युसुफ वडगाव, ता. केज जि. बीड.) 5. आयु. जालिंदर ठवरे, (जि. प. प्राथमिक शाळा,रेवकी ता.गेवराई जि. बीड.) 6. आयु. संजय कांबळे, (लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, परतुर, जि. जालना.) 7. प्राचार्य,संघमित्रा गोणारकर, (सावित्रीबाई फुले महिला बी.एड. कॉलेज,नांदेड.) 8. श्रीमती भावसार अश्विनी रामराव, ( जि. प. प्राथमिक शाळा वाणीसंगम, जि. परभणी.) 9. आयु. वडमारे सचिन, (भगवान विद्यालय,बीड.) 10. आयु. गायकवाड दादासाहेब, (विवेकानंद विद्यालय,केज. जि. बीड.) 11. आयु. शामसुंदर बगाटे, (जि. प. प्राथमिक शाळा,लोणी, जि. परभणी.) 12. आयु.भादवे सुभाष, ( जि. प. प्राथमिक शाळा, केरूळ, ता. आष्टी जि. बीड.) 13. श्रीमती रेणुका मुक्ताराम दोडके, (जि. प. प्राथमिक शाळा, थेरला, ता. पाटोदा जि. बीड.) 14. प्रा. डॉ. अनिता शिंदे, ( सौ.के. एस. के. महाविद्यालय, बीड.) 15. आयु. गणेश मैंद, (विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय, जोडबोडसर, जि.छ. संभाजीनगर.) 16. हेमलता सुनील गजबे,( एम.एस.सी. नर्सिंग कॉलेज,जे.जे.हॉस्पिटल, मुंबई.)
तरी या पुरस्कार सोहळ्यासाठी शिक्षणप्रेमी आणि समाजातील सर्वच घटकांनी व पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन बीड जिल्हा मुप्टा संयोजन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *