महसुल व पोलिस प्रशासनच्या अचूक नियोजनामूळे वाळू उपसा बंद
उप विभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू व महसुल प्रमुखांचे पथके गोदापात्रात ठाण मांडून
गेवराई दि 11 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील गेवराई तलवाडा,चकलांबा,यासह गेवराई महसूल हद्दीतील सुरू होणारा अवैध वाळू उपसा याला गेल्या काही दिवसांपासून ब्रेक लागला असल्याचे चित्र असून महसूल व पोलिस प्रशासनातील उप विभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू,व महसूल प्रमुख संदिप खोमणे यांची पथके गोदापात्रात ठाण मांडून आहेत.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेल्या महिना भरापासून स्थानिक प्रशासन निवडणूकीच्या कामकाजात व्यस्त होते तसेच यांचा फायदा वाळू माफिया घेत होते तसेच गोदाकाठच्या नागरिकांना यांचा नाहक त्रास झाला होता यामुळे महसूल व पोलिस प्रशासन एक्शन मोडमध्ये आले असून तहसिलदार संदिप खोमणे यांनी गेल्या तिन दिवसांपुरी गेवराई व पैठण सिमेवर असनाऱ्या बोरगांव बू याठिकाणाहून चतूराईने सहा हायवा ताब्यात घेतल्या तसेच चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील सहा वाळू माफिया यांच्यावर हद्दपारी सारखी कडक कार्यवाई गेवराईचे उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांनी केली असल्यामुळे वाळू माफियांत मोठी खळबळ माजली आहे तसेच गेल्या पाच दिवसापासून महसूल प्रमुख व पोलिस प्रशासनातील प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली पथके गोदापात्रात ठाण मांडून असल्या कारणाने अवैध वाळू चोरीला लगाम लागला आहे कायद्याचा धाक आबाधीत राहिला पाहिजे तसेच यापुढे कोणत्याही अवैध धंद्याल्याची गय केली जाणार नसल्याचे उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांनी सांगितले असून गोदाकाठच्या गावात महसूलचे पथके चोविस तास उपलब्ध असून वाळू चोरी प्रकरणात कायदेशीर व कडक कार्यवाई करणार असल्याचे देखील महसूल प्रमुख संदिप खोमणे यांनी स्पष्ट केले आहे.