वाळू माफियांना दणका सहा हायवावर तहसिलदार यांची कार्यवाई
दिड कोटींचा मुद्देमाल जप्त
गेवराई दि 7 ( वार्ताहार ) तालुक्यातील जूने बोरगाव याठिकाणच्या गोदापात्रातून अवैध वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती गेवराई महसूल प्रमुख तहसिलदार संदिप खोमणे यांना मिळाली होती तसेच त्यांनी सदर ठिकाणी आपल्या पथका समवेत छापा मारला असता सहा हायवा ताब्यात घेतल्या असून अंदाजे दिड कोंटीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कार्यवाई आज ( दि 7 डिंसेबर ) रोजी सकाळी आठच्या सुमारास केली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई महसूल विभागाच्या हद्दीत गेवराई पैठण या सिमेवर असनाऱ्या जूने बोरगाव परिसरातून अवैध वाळू उपसा फोफावला होता तसेच यांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत्या परंतू दोन तालुक्याच्या सिमेवर असनाऱ्या गाव असल्या कारणाने यावर सदर ठिकाणी प्रशासन पोहचेपर्यंत वाहने दूसऱ्या हद्दीत प्रवेश करायची ही बाब लक्षात घेऊन तसेच चतूराईने गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे यांनी आपल्या पथका सोबत गोदापात्रात छापा मारला यामध्ये सहा हायवा ताब्यात घेतल्या आहेत तसेच अंदाजे दिड कोंटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच ही सगळी वाहने महसूलने पुढील कार्यवाई साठी ताब्यात घेतल्या असून सदरची कार्यवाई ही तहसिलदार संदिप खोमणे,मंडळ अधिकारी परमेश्वर सानप, विठ्ठल आम्लेकर,बाळासाहेब पखाले,चांदणे,शेंबडें,तलाठी ढाकणे,दांडगे,बाविस्कर,कोंढरे,गायवाड,शिंदे,काळे,यांनी केली आहे.