गेवराई दि 29 ( वार्ताहार ) तालुक्यातील मादळमोही ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सिमा आंनद सरपते यांच्या विरूद्ध राजकीय तक्रार दाखल करूण भष्ट्राचार केल्या प्रकरणी गून्हा दाखल करण्यात आला होता तसेच वरील प्रकरणात राजकीय हस्ताक्षेप करूण गून्हा दाखल आला असल्याचे मत व तसेच युक्तीवाद ग्राह्य धरून गेवराई न्यायालयाने सदर प्रकरणात मादळमोही येथील माजी सरपंच सिमा आनंद सरपते यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
या बाबद सविस्तर माहिती अशी की,मादळमोही येथील माजी सरपंच सीमा अनंत सरपते येथील व तत्कालीन ग्रामसेवक यांनी मिळून मौजे मादळमोही गावातील विविध कामाकरिता 14 वित्त आयोग कृती आराखडा प्रमाणे सन 2016 17 व 17 18 या वित्तीय वर्षाकरिता ग्रामसभेने मान्यता दिली नुसार आरोग्य केंद्रासाठी पाणीपुरवठा सुविधा करिता 19 लाख 50 हजार तीन रुपये महिला व बालविकास अंगणवाडी वॉटर फिल्टर व साहित्यासाठी दोन लाख 75 हजार रुपये विंधन विहीर इलेक्ट्रिक मोटर सिमेंट पाण्याची टाकी व इतर साहित्य करिता तीन लाख 39 हजार 438 रुपये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश वाटपासाठी 75000 रुपये सौर पथदिवे करिता तीन लाख 25 हजार रुपये एलईडी पथदिवे करिता दोन लाख 50 हजार रुपये असे एकूण 32 लाख 14 हजार 441 रुपयाच्या कामाचा ठराव घेऊन नमूद कामे मंजूर केले त्यानंतर तत्कालीन ग्रामसेवक व माजी सरपंच सीमा अनंत सरपंच यांनी मिळून सदर कामाचे पैसे चौदाव्या वित्त आयोगाच्या खात्यावरून रक्कम 16 लाख 63 हजार 131 रुपये तसेच एमआरईजीएस अंतर्गत कुशल कामासाठी 11 लाख 13 हजार 42 रुपये शासनाकडून मंजूर होते. 14 व्या वित्त आयोग अंतर्गत 14 लाख 59 438 रुपयांच्या कामास मंजुरी मिळण्याकरिता कृती आराखडा तयार करून शासनाकडून मंजुरी घेऊन 16 लाख 63 हजार 131 रुपयाच्या सामानाची खरेदी केली असल्याचे भासवून बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप माजी सरपंच सीमा अनंत सरपटे व ग्रामसेवक यांच्यावरती होता.
सदर प्रकरणांमध्ये राजकीय दबाव आणून गेवराई पंचायत समिती येथील तत्कालीन गटविकास अधिकारी श्री. माळवे यांच्यामार्फत माजी सरपंच सीमा अनंत सरपते व ग्रामसेवक नागरगोजे यांच्याविरुद्ध अपहार व खोटे दस्तावेज बनवून शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद पोलीस स्टेशन गेवराई येथे दाखल केली होती सदर प्रकरणांमध्ये सपोनि संदीप काळे यांनी सदर प्रकरणाचा तपास करून गेवराई न्यायालयांमध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते सदर प्रकरणांमध्ये आरोपी माजी सरपंच सीमा आनंद सरपते विरुद्ध कसलाही सबळ पुरावा नसल्याचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायमुर्ती एस पी वानखडे यांनी सरपंच सिमा आनंद सरपते यांची निर्दोष मुक्तता केली आहे तसेच आरोपीच्या वतिने विधिज्ञ सोमेश्वर कारके यांनी काम पाहिले आहे.
संपादकाला धमकी वजा चितावनी देणाऱ्या आघाववर बडतर्फीची कार्यवाई करा गेवराई तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सर्व पत्रकार संघाच्या वतिने निवेदन गेवराई...