January 22, 2025

विजय नशीबवान आहे, त्याला तुमच्या पदरात घ्या – अमरसिंह पंडित

एक वेळ फक्त आशीर्वाद द्या, तुमचा हिरमोड होऊ देणार नाही – विजयसिंह पंडित

गेवराई दि.१९(प्रतिनिधी) शिवछत्र परिवाराच्या संस्काराने विजयसिंहची जडण घडण झालेली आहे. जिल्हा परिषदेचा सदस्य आणि अध्यक्ष ही पदे भुसवत असताना विजयने आपल्या कामाची चुणूक दाखवलेली आहे. त्याचा उत्साह विकासाला गती देणारा आहे. विजय नशीबवान आहे. त्याला पदरात घ्या. घड्याळाचा गजर करा‌ विक्रमी मताधिक्याने विजयसिंह पंडित यांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी केले तर गेवराई विधानसभा मतदारसंघ माझे घर आहे, या घराच्या विकासाची बांधिलकी माझ्याशी आहे. फक्त मला एक वेळ आशीर्वाद द्या. माझ्यावर विश्वास टाका. मी तुमचा हिरमोड होऊ देणार नाही. भविष्यात गेवराई तालुका बीड जिल्ह्याच्या नकाशावर विकासाचा तालुका ओळखला जाईल. घड्याळाच्या समोरचे बटन दाबून मला काम करा करण्याची संधी द्या असे भावनिक आवाहन महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी केले आहे.

गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार संपला आहे. त्या पार्श्वभूमीवर विजयसिंह पंडित यांनी उद्याच्या मतदानासाठी मतदारांना भावनिक आवाहन केले. मागील निवडणुकीत माझा पराभव झाला पण दुसऱ्या दिवसापासून तुमच्यात मिसळलो. पाच वर्षा नंतर पुन्हा मी तुमच्यासमोर आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. माझ्याकडे फक्त विकासाचा अजेंडा आहे मला कोणावरही टीका करायची नाही. खालची पातळी गाटायची नाही. तालुक्याच्या विकासासाठी, तरुणांच्या भवितव्यासाठी मला काम करायचे आहे, त्यासाठी विधानसभेत जाणे गरजेचे आहे. आपल्या सर्वांच्या पाठबळावरच हे शक्य आहे, त्यामुळे मला आशीर्वाद द्या, काम करण्याची संधी द्या. एक वेळ विश्वास टाका मी तुमचा हिरमोड होऊ देणार नाही. आपल्या हिताचा कोण आहे याचा विचार करा आणि मतदान केंद्रात जाताना आपल्या सद्सदविवेक बुद्धीला स्मरून घड्याळ या चिन्हासमोरचे बटन दाबा आणि मला आशीर्वाद द्या असे आवाहन विजयसिंह पंडित यांनी केले‌

मतदारांना आवाहन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित म्हणाले की, आपल्या राजकीय जीवनामध्ये आपण कधीही कुणाचेही नुकसान केले नाही, गेवराई विधानसभा मतदारसंघ समृद्ध व्हावा प्रगतीपथावर यावा, तालुक्यात पाणी खेळावे, शेतकऱ्यांच्या घरामध्ये लक्ष्मी यावी यासाठी आपण कायम प्रयत्न करत आहोत. प्रसंगी रस्त्यावरही उतरलो आहोत. या पुढील काळातही आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी शिवछत्र परिवाराच्या पाठीशी आपल्या आशीर्वाची गरज आहे. आपले सहकार्य आज महत्त्वाचे आहे. त्यामुळे संभ्रमात राहू नका आपल्याशी प्रामाणिक राहून घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून विजयसिंह पंडित यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दरम्यान गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित नंबर एक वर असून त्यांना सर्वत्र मतदारांचा कौल मिळत आहे. आपला विजय कोणी रोखू शकत नाही अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते व्यक्त करत आहे. विजयसिंह पंडित विकासाच्या मुद्द्यावर बोलतात, असा बोलणारा मनुष्य विधानसभेत जाणे गरजेचे आहे, त्यासाठी मतदारांची ताकद विजयसिंह पंडित यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी चर्चा जाणकार व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *