“मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है,वही होता है जो मंज़ूरे खुदा होता है”
विजयसिंह पंडित यांचे पारडे जड
गेवराई दि 13 ( वार्ताहार ) तालुक्याच्या राजकारणात विजयसिंह शिवाजीराव पंडित हे नाव नविन नाही किंवा आताच उगम झालेलं नेतृव नाही विजयसिंह पंडित युवा मंच च्या नावाने तयार केलेली युवकांची फळी जिप अध्यक्षपद राजकारण कमी आणि सामाजिक कार्य जास्त ही या युवा कार्यकर्त्याची ओळख गत विधानसभेत अल्पशा मताने झालेला पराभव मान्य करून पाच वर्ष नव्या जोमाने काम करणारे विजयसिंह शिवाजीराव पंडित हे विधानसभा निवडणूकीला सामोरे जात आहेत आणि गावागावात मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंज़ूरे खुदा होता है” अश्या चर्चा सुरू असून येणाऱ्या निवडणूकीत त्यांचे पारडे जड असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तालुक्याच्या राजकारणात वडिल माजी मंत्री शिवाजीराव पंडित तसेच भाऊ मा आ अमरसिंह पंडित यांचा वसा घेऊन गेवराई तालुक्याच्या राजकारणात विजयसिंह पंडित यांची पकड आहे कोणतेही सामाजिक कार्य असो त्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो छ शिवाजी महाराज यांची जंयती असो किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती असो त्यांचे नाव सार्वभूम म्हणून घेतले जाते शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जान आणि विकासाचा आयडॉल त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बीड जिल्हाला दाखवून दिलेला आहे या विधानसभा निवडणूकीत अंसख्य कार्यकर्ते यांची फौज तसेच विकासात्मक दृष्टीकोण समोर ठेऊन ते निवडणूकीला सामोरे जात असल्याकारणाने मतदार संघात त्यांच्या विषयी पोशक वातावरण निर्माण झाले असून निवडणूकीत त्यांना प्रथम क्रंमाकाची पंसती मिळण्याचे संकेत नाकारूजाऊ शकत नाही सर्वसामावेक्षक आश्वासक उमेदवार म्हणून निवडणूकीत त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...