May 2, 2025

मराठा समन्वयक माऊली नवले यांची भूमिका जाहिर 

विधानसभा निवडणूकीत विजयसिंह पंडित यांना मदत करणार 

गेवराई दि 16 ( वार्ताहार ) मराठा आरक्षण काळात भरपूर मेहनत घेणारे माउली नवले यांनी आपली भुमिका स्पष्ट करत सर्व मराठा आरक्षण चळवळीत सहभागी सदस्य यांना विजयसिंह पंडीत यांना मतदान करून विजय करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना काळात सखे परखे झाले आशा काळात विजयसिंह पंडित लोकांच्या मदतीला धावत येऊन कोविड सेंटर उभा करून हजारो लोकांचे प्राण वाचले.सिंधफणा नदीवर सिरस मार्ग बंधारा बांधला हजारो एकर जमीन बागायती क्षेत्र तयार केले. पाणी पातळी वाढविण्यासाठी सिंधफणा नदीवर मोठे साखळी बंधारे निर्माण करून सर्व तालुका बागायत क्षेत्र तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. तालुक्यात बंधारे, नदी खोलीकरण, पांदण रस्ते, सिमेंट रस्ते, स्मशाभूमी, शाळा, अंगणवाडी असे अनेक विकास कामे करून तालुक्याच्या वैभवात भर टाकली. गेले अनेक वर्षे मराठा आरक्षण चळवळीत शिवछत्र परिवार आहे. शहागड सभेस आर्थिक मदत करत मराठा आरक्षण योद्धा मनोज जंरागे यांच्या समर्थनार्थ शिवछत्र परिवार उभा होता. बीड येथे मराठा मोर्चात नाष्टा फराळ सोय ते नारायण गड दसरा मेळावा येथे लाखो रु ची साखर असे एक ना अनेक कामातून शिवछत्र परिवार मराठा आंदोलनात आग्रही सहभागी झाला आहे. ऋषिकेश दादा बद्रे यांच्यावर झालेल्या केस मध्ये पण आदरणिय विजयसिंह पंडीत यांनी तो माझा मित्र कार्यकर्ता आहे असे ठाम सांगून बाजू घेतली. मराठा आंदोलनात माझ्या परिवारावर 50 पेक्षा जास्त केसेस संपूर्ण राज्यात झाल्या आहेत त्या सर्व केसेस मध्ये शिवछत्र परिवार माझ्या सोबत ठाम उभा राहिला मला मदत केली.  मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलूनच मी हा निर्णय घेतला असे त्यांनी स्पष्ट केले आहे. संकट काळात आरक्षण चळवळीत काम करणाऱ्या लोकांना मदत करणाऱ्या विजयसिंह पंडित यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन मराठा समन्वयक माउली नवले सरपंच यांनी केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सर्व तालुक्यांतील मराठा तरुणांनी नोद घेउन विजयसिंह पंडीत यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *