January 22, 2025

भुलथापांना बळी पढू नका, कोणताही उमेदवार उभा केला नाही

युती धर्म पाळून विजयसिंह पंडित यांना विक्रमी मताने विजयी करा – आ. पंकजाताई मुंडे

 

गेवराई दि.12( वार्ताहार ) राज्यामध्ये महायुतीचे सरकार आणण्यासाठी महायुतीचे सर्व आमदार निवडून येणे आवश्यक आहे. मुंडे साहेब आमदारांची फॅक्टरी होते. मीही त्यांचीच मुलगी असून बीड जिल्ह्यातील सर्व आमदार मला निवडून आणायचे आहेत. मी कोणताही उमेदवार उभा केला नाही, भुलथापांना बळी पढू नका, मी युती धर्मच पाळणार व युती धर्म पाळून विजयसिंह पंडित यांना विक्रमी मताने विजयी करा असे आवाहन आ. पंकजाताई मुंडे यांनी केले ले. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह शिवाजीराव पंडित यांच्या प्रचारार्थ चकलंबा येथे आयोजित प्रचार सभेमध्ये बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रकाशराव सुरवसे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे, किशोर कांडेकर, रविकांत राठोड, कडूदास कांबळे, डॉ. विजयकुमार घाडगे, शेख तय्यब भाई, शेख खाजाभाई, ॲड. राहुल राका, गणु आबा खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, विकास कामे ही सरकारने निधी दिल्याने व वरिष्ठांनी सहकार्य केल्याने होत असतात. त्याला मी केले मी केले असे म्हणणे म्हणजे अहंकारच आहे. भैय्यासाहेबांना विकासाची दूरदृष्टी आहे. ते आमदार असताना सिंदफणा नदीच्या बॅरिजेस विषयीची त्यांची धडपड मी स्वतः पाहीली आहे. तेच ध्येय घेऊन विजयसिंह पंडित हे तालुक्याच्या विकासासाठी निवडणूक लढवत आहेत. मी त्यांच्यासोबत सहकार्य करेल व या भागाच्या विकासासाठी भरीव असे योगदान देईल. या भागातील माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य करावे. भैय्यासाहेबांनी मला शब्द दिला आहे की, मुंडे साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानच राखला जाईल. त्यामुळे विजयसिंह पंडित यांना विजय करणे हे माझे ध्येय आहे. या ठिकाणी मी ज्यांची सभा घेते त्यांचा विजय नक्की होतो.विरोधक अपप्रचार करत आहेत. मी कोणालाही शब्द दिला नाही. त्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी न पडता उद्याच्या निवडणुकीमध्ये घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयसिंह पंडित यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे.

यावेळी बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, गेवराई विधानसभा मतदारसंघ हा गोदावरी व सिंदफणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात आहे. त्यामुळे मतदारसंघ पाणीदार करण्यासाठी मला संघर्ष कन्या पंकजाताई मुंडे यांचे सहकार्य लाभणार आहे. त्यांच्या सहकाऱ्यानी महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामध्ये पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला मंत्रीपद भेटणार आहे. त्याचा उपयोग आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी होणार आहे. त्यामुळे आपल्या राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी व या भागाचा विकास करण्यासाठी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे भावनिक आवाहन त्यांनी केले. यावेळी पांडुरंग नागरे, दिनकर तोंगडे, माऊली खरे, मच्छिंद्र शेळके, संभाजी घाडगे, विकास सानप, उद्धव रासकर, अविनाश टिंगरे, श्रीकांत सानप, बाळासाहेब सानप, गोवर्धन टकले, गणु आबा खेडकर, अंबादास सांगळे, रवींद्र कानडे, मच्छिंद्र शेळके, माऊली खरे, सुंदर महाराज चव्हाण, गणेश सावंत, गजानन काळे, रमेश नागरगोजे, दिनकर तांगडे, फुलचंद बोरकर, गोवर्धन घोडके, मंगल राठोड, कविता डोंगरे यांच्या सह हजारो मतदार बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *