गेवराई दि 12 ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाणे हद्दीच्या सिमेवर एक आयशर टेम्पोत गूटख्याची तस्करी केली जात होती त्याठिकाणी गस्तीवर असनाऱ्या पोलिसांनी सदर टेम्पोची पाहणी केली असता यामध्ये मोठ्या प्रमाणात गूटखा मिळून आला असून सदरच्या कार्यवाईत 50 लाखं रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कार्यवाई ( दि 12 रोजी ) रात्री दोनच्या दरम्यान केली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,वरील ता वेळी व ठिकाणी यातील आरोपी हा विना विना परवाना बेकायदे शिररीत्या स्वतःचे फायद्यासाठी गुटखा हिरा पान मसाला सुग्धीत तंबाखु मुदेमाल त्याबाबत महाराष्ट्र शासनाने साठा व विक्री वाहतुन प्रतीबंधित केला सुगधीत पान मसाला तबाखु मिश्रीत गुटका व अन्य पदार्थ मानवी आरोग्यास हानिकारक असुन त्याचे सेवन केल्याने कर्क रोगसारखा गंभीर आजार होतो यांची जाणीव आसुन आसतान सुध्दा नमुद प्रतिबंधित पान मसाला व सुधित तबांखु आरोपीने टेम्पो मध्ये चोरटी विक्री करीत आसताना मिळून आला तसेच यांच्या विरूद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला असून सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू,यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदिप पाटील,पोउपनि पानपाटील,पोह अमोल येळे,पी सी घोंगडे,पो ना गूजर,पी सी यमगर,एस एस टी पथक यांनी केली आहे