वाळूच्या दोन हायवावर पोलिस अधीक्षक पथकांची कार्यवाई
गेवराई 6 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यात अंचार संहीता सुरू असतांना वाळू माफियांनी डोक वर काढले असल्याचे चित्र असतांना पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या विषेश पथकाने पहाटे तिन वाजण्याच्या सुमारास पाडळशिंगी टोल जवळ वाळूने भरलेल्या दोन हायवा वर कार्यवाई केली असून ह्या कार्यवाईत अंदाजे 50 लक्ष रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,राष्ट्रीय महामार्ग बीड जालना रोडवरून वाळूने भरून दोन हायवा बीडकडे येत असल्याची माहिती गूप्त बातमीदाराने पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या विषेश पथक प्रमुख सपोनि बाळराजे दराडे यांना दिली तसेच त्यांनी पाडळशिंगी रोडवर या दोन्ही हायवा वाळूने भरलेल्या ताब्यात घेतल्या असून ही वाहने गेवराई पोलिस ठाण्यात लावण्यात आली असून यावर दंडात्मक कार्यवाईसाठी पत्र व्यवहार महसूल कडे करण्यात आला असल्याची माहिती असून सदरची कार्यवाई ही पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदशनाखाली सपोनि बाळराजे दराडे यांनी केली आहे.