दोन कोटींचा मुद्देमाल जप्त;तहसिलदार संदिप खोमणे यांची माहिती
गेवराई दि 4 ( वार्ताहार ) तालुक्यातील राक्षसभूवन परिसरातून चोरटी वाहतूक करूण त्यांची स्वत;च्या फायद्यासाठी वापर करण्यात येत असून अश्या तिन हायवा राक्षसभूवन परिसरात महसुल पथकांने पकडल्या असून या कार्यवाईत अंदाजे दोन कोंटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे यांनी दिली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,(दि 4 नोंहेबर ) रोजी राक्षसभूवन परिसरातील गोदापात्रातून वाळूची हायवाव्दारे तस्करी करण्यात येत असल्याची माहिती गूप्त बातमीदाराने गेवराईच्या महसूल प्रमुखांना दिली तसेच त्यांनी सदर ठिकाणी आपल्या पथकाला संबंधीत हायवा वाहने ताब्यात घेण्याच्या सुचना केल्या व राक्षसभूवन सिंमेट रस्त्यावरूण बीड व जालना परिसरात जात असतांना तिन हायवा महसूल पथकांने ताब्यात घेतल्या असून पुढील कार्यवाईसाठी ही वाहने बसडेपो याठिकाणी लावण्यात आल्या आहेत व या कार्यवाईत अंदाजे दोन कोंटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे देखील महसूल प्रमुख संदिप खोमणे यांनी सांगितले आहे.