April 19, 2025

महेश दाभाडे सह 24 जणांची विधानसभा निवडणूकीतून माघार

21 जण निवडणूकीच्या रिंगणात

गेवराई दि 4 ( वार्ताहार ) होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीची अर्ज माघार घेण्याची आजची अंतिम तारीख होती तसेच गेवराई मतदार संघात गेल्या दोन वर्षापासून विधानसभा निवडणूकीची तयारी करणारे तसेच माजी नगरअध्यक्ष महेश दाभाडे यांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली असल्याने मतदार संघात राजकीय खळबळ माजली आहे तसेच ते कूनाला पाठींबा देतात याकडे लक्ष लागले आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,228 विधानसभा मतदार संघाची विधानसभा निवडणूक जाहिर झाली असून 20 नोंहेबर रोजी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे तसेच लोकसभा निवडणूकीत जंरागे फॅक्टर यशस्वी ठरल्यानंतर विधानसभा निवडणूकीतही याचा प्रभाव दिसणार होता तसेच मनोज जंरागे यांचे विश्वासू समर्थक असनारे महेश दाभाडे हे विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते परंतू आज शेवटच्या दिवशी त्यांनी विधासभा निवडणूकीतून माघार घेतली असल्याने गेवराई मतदार संघात खळबळ माजली असून त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे तसेच त्याच्यांसह 24 जणांनी या निवडणूकीतून माघार घेतली आहे तसेच बदामराव पंडित शिवसेना उद्धव ठाकरे गट,विजयसिंह पंडित राष्ट्रवादी अजित पवार गट,प्रिंयका शिवप्रसाद खेडकर वंचित आघाडी, आ लक्ष्मण पवार अपक्ष, मयुरी खेडकर मनसे,प्रा पी टी चव्हाण अपक्ष यासह अनेक उमेदवार आपले नशीब विधानसभा निवडणूकीत आजविनार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *