सिमा तपासणी दरम्यान 20 किलो गांजा पकडला

बीड आरटीओ निरीक्षक संतोष पाटील यांची कार्यवाई

बीड दि 27 ( वार्ताहार ) दिवाळी तसेच आचार संहितेच्या अंनूषगाने सिमा तपासणी दरम्यान बसमध्ये प्रवास करनाऱ्या एका ईसमाच्या बॅग तपासणी केली असता त्यामध्ये 20 किलो गांजा सापडला आहे तसेच बीड आरटीओचे निरीक्षक संतोष पाटील यांनी ही कार्यवाई केली आहे.

या बाबद सविस्तर माहिती अशी की,दिवाळी व आचारसंहिता यामुळे आरटीओ विभागाच्या परिवहन आयुक्त यांच्या आदेशान्वये आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून आचारसंहितेचा भंग तसेच अमली पदार्थांची तस्करी होऊ नये म्हणून विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे.या मोहिमेत बीड कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक श्री संतोष पाटील यांनी कर्नाटक मधून महाराष्ट्रात येणाऱ्या बसची तपासणी केली असता एका बस मधून अंदाजे 20 किलो गांजा तस्करी करणाऱ्या संशयित व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्याकडे असणाऱ्या बॅगमध्ये 20 किलो गांजा सापडला.सदर व्यक्तीस पुढील कारवाईसाठी व गुन्हा दाखल करणे करता उमरगा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे तसेच रामा विठोबा हिरवे असे या आरोपीचे नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *