गांज्याच्या शेतीवर चकलांबा पोलिसांची मोठी कार्यवाई
शंभर किलो गांजाची झाडे जप्त;दहा लक्ष रुपयांचा मुद्देमाल ताब्यात
गेवराई दि 25 ( वार्ताहार ) तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील पौळाची वाडी शिवारातील एका शेतात गांज्याची शेती केली जात असल्याची माहिती चकलांबा पोलिस ठाणाचे सपोनि संदिप पाटील यांना मिळाली होती त्यावरून त्यांनी आज ( दि 25 रोजी ) सकाळी 7 च्या सुमारास याठिकाणी छापा मारला असता यामध्ये अंदाजे शंभर कीलो गांजाची झाडे सापडली असल्याने मोठी खळबळ माजली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,तालुक्यातील पौळाचीवाडी परिसरातील गट क्र 472 मध्ये गांजा या आम्लिपदार्थ यांची झाडे स्वत;च्या अर्थिक फायद्यासाठी केली जात आहे अशी माहिती चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनि संदिप पाटील यांना मिळाली होती तसेच त्यांनी सदर ठिकाणाची गोपनिय पाहणी करूण आज सकाळी अचानक आपल्या पथकासह छापा मारला असता शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे लावण्यात आली होती तसेच अंदाजे शंभर कीलो याचे वजन आहेत तसेच दहा लक्ष रुपयांचा मुद्देमाल चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणी आरोपी बाबद पोलिसांनी मोठी गुप्तता पाळली असून खूप मोठे रॅकेट यामध्ये उघड होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे तसेच सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,उप विभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांच्या मार्गदरशनाखाली,सपोनि संदिप पाटील,पोउपनि अंनता तांगडे,पोउपनि पानपाटील,पोउपनि कूमावत,पोह प्रधान,पोह अमोल येळे,खेडकर,गूजर,घोंगडे,पवळ यांनी केली आहे.