January 22, 2025

पाच वर्षात जमलं नाही ते विजयसिंहांनी महिनाभरात करुन दाखविले गेवराई तालुक्यातील १२०६० निराधारांचे अर्ज मंजुर

समितीचे अध्यक्ष दादासाहेब घोडके यांची माहिती 

 

गेवराई दि 9  ( वार्ताहार )  तालुक्यातील निराधारांच्या प्रश्नांवर सातत्याने राजकीय पोळी भाजण्याचे काम आजवर सत्ताधाऱ्यांकडुन होत होते. राज्यातील सत्तांतरानंतर विजयसिंह पंडित यांनी राजकीय प्रतिष्ठापणाला लावुन संजय गांधी निराधार अनुदान समितीचे गठण केले. दादासाहेब घोडके यांच्या अध्यतेखालील समिती कार्यरत होताच त्यांनी अतिशय तत्परतेने निराधारांची प्रकरणे हाताळली. प्रशासकीय यंत्रणेला समिती सदस्यांनी अक्षरशः खांद्याला खांदा देवुन दिवसरात्र एक करत गेवराई तालुक्यातील प्राप्त झालेल्या १५६३० एकुण अर्जाची बारकाईने तपासणी करुन १२०६० अर्ज मंजुर करत खऱ्या अर्थाने निराधारांना न्याय देण्याचे काम केले. विरोधकांना सत्तेत असतांनाही पाच वर्षात जे जमलं नाही ते विजयसिंह पंडित यांनी महिण्याभरात करुन दाखविल्याची चर्चा गेवराई तालुक्यात आहे.

गेवराई तालुक्यातील निराधारांचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर आला की, त्यावर राजकीय वाद आजवर होत आले आहेत. केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी अक्षरशः विधवा, दिव्यांग आणि निराधारांना तहसिल कार्यालयात बोलावुन आमदारांच्या हाताने मंजुरी पत्र वाटप करण्याचे केविलवाने प्रकारही आजवर गेवराईत घडलेले आहेत. निराधारांमध्ये सुद्धा राजकारण करुन विशिष्ट गटाच्या लोकांना प्राधान्य देण्याचे प्रकार यापुर्वी घडले होते. लाच घेवुन अर्ज मंजुर केलेल्याचे आरोप यापुर्वीच्या समितीवर मोठ्या प्रमाणावर झाले. बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी मोठा मोर्चा काढुन या प्रश्नाला वाचा फोडली होती. शेवटी राज्यातील सत्तांतरानंतर त्यांनी राजकीय प्रतिष्ठापणाला लावुन पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन नविन समिती गठीत केली. दादासाहेब घोडके यांच्या अध्यक्षतेखाली नवनियुक्त समिती सदस्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत तहसिल कार्यालयात आजवर प्रलंबित असलेल्या सुमारे १५६३० अर्जाची प्रत्यक्ष तपासणी केली.

गेवराई तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीने दि. २० सप्टेंबर रोजीच्या बैठकीत १२०६० अर्ज मंजुर केले आहेत. ‘यामध्ये श्रावण बाळ निराधार ६८७४, संजय गांधी निराधार ५१५४ आणि इंदिरा गांधी वृद्धपकाळ निराधार योजने मधील ३२ अर्जाचा समावेश आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज मंजुर करण्याची गेवराई तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. समिती सदस्यांनी लाभार्थ्यांकडुन कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे विरोधकही आमच्यावर आरोप करु शकत नाहीत. तालुक्यातील निराधारांना यामुळे खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना समितीचे अध्यक्ष दादासाहेब घोडके यांनी व्यक्त केली. त्यांनी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, माजी आ. अमरसिंह पंडित आणि बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले. यावेळी समितीचे सदस्य ज्ञानेश्वर नवले, सरवर पठाण, भारत गर्जे, बळीराम शिंदे, गोकुळ चोरमले, शाहीन पठाण, अनिरुद्र तौर, अंबादास सांगळे, शामसुंदर शिंदे आर्दीची उपस्थिती होती. गेवराई तालुक्यातील निराधारांकडुन आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *