महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीच्या तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार सुशिल टकले यांची निवड
बीड जिल्हा सहसंघटक पदी प्रताप देशमुख तर जिल्हा महिला कार्याध्यक्ष पदी दैवशाला मुंढे
गेवराई : दि 2 ( वार्ताहार )
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीच्या बीड जिल्हा सहसंघटक पदी प्रताप देशमुख, बीड जिल्हा महिला कार्याध्यक्ष पदी दैवशाला मुंडे तर तालुका प्रसिद्ध प्रमुख म्हणून दै. पुण्यभूमी चे तालुका प्रतिनिधी पत्रकार सुशिल टकले यांची निवड नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.
श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव या शाळेत कार्यक्रम गुरुवार दि.2 रोजी आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा विनाअनुदानित कृती समितीचे कार्याध्यक्ष वैजिनाथ चाटे, औरंगाबाद विभाचे कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे, मराठवाडा विनाअनुदानित कृती समितीच्या महिलाध्यक्ष वैशालीताई पाटील, बीड जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जगताप, औरंगाबाद विभागाच्या महिला सचिव मुक्ता मोटे, लातूर जिल्हाध्यक्षा मेघाताई पाटील, बीड उपजिल्हाध्यक्ष अरविंद सौंदलकर व जामकर, श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक बापुराव घुले यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कायम विनाअनुदानित कृती समितीच्या बीड जिल्हा सहसंघटक पदी प्रताप देशमुख, बीड जिल्हा महिला कार्याध्यक्ष पदी दैवशाला मुंडे तर तालुका प्रसिद्ध प्रमुख म्हणून दै. पुण्यभूमी प्रतिनिधी सुशिल टकले यांची निवड पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. या निवडी दरम्यान आपले मत व्यक्त करताना मुक्ता मोटे यांनी असे सांगितले की, आपला लढा विनाअनुदानित शाळेला अनुदान तसेच अंशतः अनुदानित शाळेला प्रचलित नियमानुसार अनुदान देण्या बाबत असून यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. ज्या प्रमाणे 20 टक्के अनुदान घेण्यासाठी सर्वांनी औरंगाबाद या ठिकाणी एकत्र येऊन जे आंदोलन केले. त्याच पध्दतीने सरकारला जाग आणण्यासाठी आता पुन्हा एकदा एकत्र येणे आवश्यक आहे. आता होणाऱ्या अधिवेशनात सर्वांनी एकजुटीने आंदोलनात सहभागी झाल्यास व आपल्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवल्यास शासन आपल्या मागण्या मान्य केल्या शिवाय राहणार नसल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले. यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निळकंठ जाधव, गंगणे सर, शिंदे सर, गायकवाड सर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर येवलेकर व प्रस्ताविक मुक्ता मोटे यांनी केले तर आभार श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बापुराव घुले यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील कर्मचारी भागवत सोळुंके, अंजली माने, हरिभाऊ आघाव, नवनाथ घुगे, वर्षा कांडेकर, योगेश म्हैसनवाड, प्रसाद कुलकर्णी, शिवाजी पवार, गोरख साकळे, बाबासाहेब कांबळे, ज्ञानेश्वर बास्टे आदींनी सहकार्य केले.