बीडच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू;वडिगोद्रीच्या पाच आरोपींचा समावेश
गेवराई दि 2 ( वार्ताहार ) पाढंरवाडी रोडवर एका वाशिंग सेंटर वर काम करणाऱ्या एका विस वर्षीय तरूणाला वडिगोद्री येथील पाच जणांनी अपहरण करूण जबर मारहान केल्याची घटना ( 30 सप्टेंबर ) रोजी घडली आहे तसेच या तरूणांवर बीडच्या एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत
याबाबद सविस्तर माहिती अशी की,किशोर दिपक शिंदे ( वय 20 वर्ष ) राहणार शिवाजी नगर गेवराई असे मारहान केलेल्या युवकांचे नाव असून तो ( दि 30 सप्टेंबर ) रोजी कामावर असतांना वडिगोद्री येथील त्याच्याच परिचयाचे पाच लोक आले व त्याला म्हणू लागले चोरी करण्यास चल असे म्हटल्यानंतर सदरच्या युवकांने याला विरोध केल्यानंतर त्याला बळजबरीने गाडीत बसवून दारू पाजून जबर मारहान करण्यात आली तसेच त्यांंच्या पायात चाकू खूपसला आहे दरम्यान ह्या तरूणाला अनेक वेगवेगळ्या ठिकाणा वरून सोनपेठ परिसरात फेकून दिले तसेच वरील तरूणांच्या आईला सगळा प्रकार माहिती झाल्यानंतर या तरूणाला जखमी अवस्थेत त्यांच्या आईने आनले व त्याला बीड येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे तसेच सदरचे प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे आहे परंतू अद्याप या प्रकरणात गून्हा दाखल झालेला नाही.