January 22, 2025

जिल्हा स्तरीय 17 वर्ष वयोगटात खो-खो स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कुल गेवराई विद्यालय प्रथम

 

नेवासा दि 27 ( वार्ताहार ) अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर व रेसिडेन्सीयल हायस्कूल शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय खोखो स्पर्धा शेवगाव येथे 19/09/2024 रोजी पार पडल्या त्या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल गेवराई तालुका नेवासा या विद्यालयाच्या 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला व सोलापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.खेळाडूंना विद्यालयाचे मुख्याध्यापक व क्रीडाशिक्षक श्री संजय राजगुरू सर, प्रशिक्षक श्री शोएब पठाण सर श्री नारायण कडूपाटील सर, श्री सचिन कर्डिले ,श्री अभिजीत पाटेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

विजयी संघाचे भारत सर्व सेवा संघ पाचेगाव या संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र नलगे सर सचिव श्री प्रकाश जाधव सर खजिनदार श्री हनुमंत पाटील सर , माजी अध्यक्ष श्री जे एम कल्हापुरे सर संचालिका सौ अलका पाटील मॅडम, संचालक श्री विनायक कल्हापुरे, व राजेंद्र जंगले सर्व संस्था पदाधिकारी व गेवराई गावचे सरपंच, चेअरमन सर्व क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी विद्यालयाचे माजी विद्यार्थी पालक ग्रामस्थ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले
तसेच नेवासा तालुका क्रीडा अध्यक्ष श्री नारायण कडूपाटील व श्री तूवर पाटील सर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *