गेवराई दि 24 ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील दूरक्षेत्र उमापुर पोलिस चौकीची हद्दीत एक ईसम रिक्षात गेवराईकडे आठ तलवारी घेऊन जात असल्याची माहिती गूप्त बातमीदाराने चकलांबा पोलिसांना दिली तसेच चकलांबा पोलिसांनी सदरचा रिक्षा व एकजन याला ताब्यात घेतले आहे तसेच या कार्यवाईत 18 अंदाजे हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि नारायण एकशिंगे यांनी दिली आहे. सदरची कार्यवाई (दि 24 सप्टेंबर ) रोजी साडे सहाच्या दरम्यान केली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,बीड पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार कायदा व सुवेस्थेला बाधा आणनाऱ्या ईसमा विरूद्ध कडक कार्यवाईचे आदेश दिले असल्याने आज गोपनिय बातमीदाराने चकलांबा पोलिसांना एम एच 16 एसी 416 या रिक्षात एकजन आपल्या अर्थिक फायद्यासाठी आठ तलवारी गेवराईकडे घेऊन जात असल्याची माहिती दिली तसेच त्यावरून चकलांबा पोलिसांनी सदरचा रिक्षा व चालक व त्यातील एक प्रवासी याला ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने त्यांचे नाव रतन देवराव पवार ( वय 43 वर्ष ) असे सांगितले तसेच तलवारी बाबद परवाना असल्याचे विचारले असता त्याच्याकडे कुठलाही परवाना मिळून आला नाही तसेच एक रिक्षा वरील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया चकलांबा पोलिसांत सुरू असून सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ ,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू,सपोनि नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखी पोउपनि अंनता तागडे,पोअ तूकाराम पवळ,पोशी विनोद सुरवसे,पोशी प्रशांत घोंगडे,यांनी केली आहे