हिंगणगावात तिन केन्या पकडल्या स्थानिक गून्हे शाखेची कार्यवाई
पंदरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त;तिन जण अटक
गेवराई दि 21 ( वार्ताहार ) तालुक्यातील हिंगणगाव परिसरात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती गूप्त बातमीदाराने स्थानिक गून्हे शाखेला दिली तसेच सदर ठिकाणी स्थानिक गून्हे शाखेने छापा मारला असता तिन केन्या ट्रॅक्टरसह ताब्यात घेण्यात आल्या आहेत तसेच या कार्यवाईत अंदाजे अंदाजे पंदरा लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच या प्रकरणी तिन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.तसेच ही कार्यवाई ( दि 21 सप्टेंबर ) रोजी चार वाजण्याच्या सुमारास केली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई पोलिस ठाणे हद्दीतून हा अवैध वाळू उपसा सुरू होता तसेच स्थानिक ठाणेदार तसेच महसूल ला याबाबद कल्पना कशी?नव्हती तसेच हिंगणगाव परिसरात गूप्त बातमीदार यांने स्थानिक गून्हे शाखा याला सदर ठिकाणी अनाधीकृत वाळू उपसा केल्या बाबद माहिती दिली तसेच स्थानिक गून्हे शाखेने हिंगणगाव परिसरातील गोदापात्रात छापा टाकला वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तिन केन्या ट्रॅक्टर सह जप्त करण्यात आल्या असून तिन जणांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असून सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर ,पोनि उस्मान शेख ( स्था गू शा ) यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मुरकूटे,ए एस आय जकताप,पोह ठोंबरे,पोह वाघमारे,चालक राठोड यांनी केली आहे.