तलवार प्रकरणात आणखी सात ते आठ जणांचा सहभाग?

उमापुर कनेक्शन पोलिस उघड करणार का?

 

गेवराई दि 16 ( वार्ताहार ) गेल्या दोन दिवसांपुर्वी गेवराईचे उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांना गूप्त बातमी दारामार्फत खबर मिळाली की राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 52 वर हॉटेल त्रिमूर्तीवर एक ईसम 18 तलवार घेऊन येणार सदर प्रकरणी त्यांनी गेवराई पोलिसांना याबाबद सुचना देऊन आरोपी व तलवारी जप्त केल्या तसेच या प्रकरणी आरोपीला न्यायालयाने जामिन ही मंजूर केला परंतू गेवराई पोलिस ठाण्यातील काही ठराविक मंडळी या प्रकरणाचा फायदा कसा ? उचलून आपला खिसा गरम कसा होईल.याकडे लक्ष देत आहेत व या प्रकरणाचे उमापुर कनेशन काय?आहे यांची माहिती सार्वजानिक करण्यास पोलिस का?घाबरत आहेत याचं कोड अद्याप उलगडत नाही.

या बाबद सविस्तर माहिती अशी की,भगवान फकिरा पवार ( वय 40 वर्ष ) राहणार हिरापूर याला 18 तलवारीसह पोलिसांनी रंगेहात पकडले होते तसेच त्यावर गेवराई पोलिसांत गून्हाही दाखल केला तसेच तपासात त्यांने सात ते आठ लोकांची नावेही घेतली परंतू गेवराई पोलिस तपासांचा भाग म्हणून या प्रकरणात माहिती देण्यास टाळाटाळ का?करत आहेत तसेच यांच्या पायामुळा पर्यंत जाणे गरजेचं आहे आगोदरच राज्यात जातिय तनाव वाढलेला आहे नव्या कोऱ्या तलवारी मिळणे यांचा अर्थ काय?समजायचा तसेच या आरोपीला गेवराई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने याला जामिन मंजूर केला आहे तसेच या प्रकरणात उमापूर कनेक्शन असल्याची माहिती आहे हा प्रकार नेमका काय?आहे यांची चौकशी करणे अपेक्षीत आहे तसेच तपासाचा भाग आहे म्हणून गेवराई पोलिस माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत व या प्रकरणातून गब्बर कसे होता येईल.याकडे लक्ष देताना दिसून येत आहेत कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सदर प्रकरणात लक्ष घालून एसआयटी स्थापण करावी व हा प्रकार उघड करावा अशी मागणी जन सामान्यातून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *