आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांनी राजकीय निर्णय मागे घ्यावा – महेंद्र जवंजाळ

गेवराई दि 16 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्याच्या राजकारणात नगरसेवक ते विधानसभा सदस्य म्हणून आपली कार्यकीर्द दहा वर्षाच्या काळात गाजवणारे रेशनचा काळाबाजार, बोगस रस्ते,गुन्हे हत्याकांड,खून दरोडे,माफिया राजवट अशा अनेक अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी आमदार लक्ष्मण आण्णा पवारांच्या रूपात गेवराईकरांनी एक कोहिनूर हिराच टिपला होता.मात्र वैयक्तिक तब्येतीने साथ न दिल्यामुळे आणि विद्यमान पालकमंत्री यांनी विकास कामात खोडा घातल्याने आदरणीय आण्णांनी राजकारणात यापुढे माझ्या घरातील सदस्य निवडणूक लढवणार नसल्याचे एका वृत्तपत्रातून स्पष्ट केले,हा कार्यकर्त्यांना धक्का बसला. भविष्यात गेवराई शहरासह तालुक्याच्या विकासाची कामे डोळ्यासमोर ठेवून आदरणीय लक्ष्मण आण्णा पवार साहेबांनी तो निर्णय मागे घ्यावा अशी मागणी महेंद्र दिनकर जवंजाळ यांनी केले आहे.

स्वच्छ गेवराई,सुंदर गेवराई बाळराजे दादा पवार यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी जेवढी जास्त मेहनत घेता येईल तेवढी मेहनत लक्ष्मण आण्णांनी व कार्यकर्त्यांनी घेतली आणि बाळराजेचा वारसा म्हणून लक्ष्मण आण्णा पवार यांनी राजकारणात 2012 साली इंट्री करत दाखल झाले.गेवराई विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे वर्ष निर्माण केले होते.दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्यावर विश्वास ठेवताना 2012-13 मध्ये भारतीय जनता पार्टी प्रवेश केला 2014 रोजी नगरसेवक ते आमदार या पदापर्यंत पोहचले गेवराईच्या आशेचा सुखाचा किरण लक्ष्मण आण्णा पवार यांच्या रूपाने,उगवला.कर्तव्यदक्ष,निर्भीड,निस्वार्थी,निष्कलंक,चारित्र्य चातुर्याने,गेवराईला गुंडगिरीच्या दहशतुन बाहेर काढत विकासाच्या दृष्टीने नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न लक्ष्मण आण्णांनी केला यासाठी आपण सर्व गोष्टीचा त्याग करू पण गेवराई स्मार्ट करू.आज गेवराई चा प्रत्येक नागरिक मोकळा श्वास घेऊ शकतो तो म्हणजे पवार घराण्यामुळे.गेवराई विधानसभा मतदारसंघातील गाव खेड्यापर्यंत रस्त्याचे जाळे विणले, शहरापासून ते खेड्यापर्यंत प्रत्येक नागरिकाला विविध असो किंवा कोणत्याही मूलभूत सुविधा असो त्या लक्ष्मण आण्णा पवारांमुळे मिळाल्या. मूलभूत सुविधा धोरणात्मक,विकास, दळणवळण,बाजारपेठ गेवराई शहराच्या वैभवात भर आमदार पवारांचे विकास कामामुळे पडली. कुटुंबप्रमुख म्हणून गेवराई शहराच्या पाठीशी उभा राहणारे पवार घराणे मूळचे पाटील हे तुम्ही दोन दिवसांपूर्वी एका वृत्तमान पत्राच्या मुलाखतीतून निवडणूक न लढवण्याचे निर्णय घेतल्याने राजकीय गणित चिंतेत पडले राजकारणातून बाजूला जाण्याचा निर्णय आपण मागे घ्यावा अशी विनंती महेंद्र दिनकर जवंजाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *