January 22, 2025

माजलगाव दि 2  ( वार्ताहार ) -माजलगाव शहराच्या हद्दीत असणार्‍या भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत आज गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला.यावेळी सहा अज्ञात दरोडेखोरांनी ‘चुप बैठो हम कोरोना टेस्ट कर रहे है’ म्हणत घरातील वृद्ध दाम्पत्यास शस्त्राचा धाक दाखवून काठीने मारहाण केली.यावेळी दरोडेखोरांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेची लूट करून पोबारा केला.

        शेतकरी कुटुंबातील लक्ष्मणराव शिंदे व सावित्री लक्ष्‍मण शिंदे हे वृंद दाम्पत्य आपल्या तीन विवाहित मुला , सुना  व नातवंडसह भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत राहतात.बुधवारी रात्री 11 च्या दरम्यान मोठा मुलगा राजेश शिंदे घरी उशिरा आले.व घराच्या मेन गेटला आतून कुलूप लाउन आपल्या पत्नीसह वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले.दरम्यान खालच्या हॉल मध्ये वृद्ध असणारे संजीवनीबाई व लक्ष्मणराव झोपून गेले.पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घराच्या मेन गेटचे कुलूप तोडत असल्याचा आवाज शिंदे वृद्ध दांपत्याला झाला. 

        दरम्यान 6 अज्ञात दरोडेखोरांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. शिंदे दाम्पत्याने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करतातच शस्त्राचा धाक दाखवून त्यांना हातातील काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.चुप बैठो हम यहा कोरोना टेस्ट कर रहे है,असे दरडावून म्हणत. घरातील सामानाची नासधूस करत कपाटात धुंडाळले.यावेळी त्यांना कपाटातील ड्रावरमध्ये एक सोन्याची साखळी,दोन सोन्याची अंगठी,सोन्याचा गंठन, सोन्याचे मनीमंगळसुत्र,सोन्याचे वेल व झुंबर आणि नगदी रक्कम असा एकुण २ लाख ४७ हजार रु किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने व रोख रखमीची लूट केली. व घराला बाहेरून  बंद करून घरातून पोबारा केला.दरम्यान या दरोड्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *