आठरा तलवारी सह एकास अटक

उपविभागीय नीरज राजगूरू यांची कार्यवाई

गेवराई दि 15 ( वार्ताहार ) बीड जिल्यातील सार्वजनिक सुव्यवस्था व कायदा व सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्हयाची धुरा सांभाळल्या पासुन शर्तीचे प्रयत्न चालु आहेत. बीड जिल्हयातील अवैध धंद्यावर व गुंडगिरी करणारे इसम यांच्यावर आळा बसविण्यासाठी व त्याचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळयासमोर ठेवुन त्यांनी गणेशोत्सव व आगामी विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे योजीले आहे त्याअनुषंगाने नीरज राजगुरु उपविपोअ गेवराई यांना मिळालेल्या गोपनिय माहिती मिळाल्या नुसार सदर ठिकाणी सापळा रचून एकास अटक करून 18 तलवारी ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती गेवराईचे उपविभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांनी दिली आहे

याबाबद सविस्तर माहिती अशी की ,गेवराई चे उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांनी  त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी अंमलदार यांनी (दि 14 सप्टेंबर रोजी ) एक वाजताच्या  सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर त्रिमुर्ती हॉटेल जवळ पाडळसिंगी टोलनाक्याजवळ सापळा रचुन इसम नामे भगवान फकीरा पवार ( वय 40 वर्ष ) रा हिरापुर ता गेवराई जि बीड यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या ताव्यातील मोटार सायकलवरुन अवैध रित्या कोणताही परवाना न बाळगता एकुण 18 नग तलवारी किंमत अंदाजे 36 हजार रुपये ची वाहतुक करतांना मिळुन आला असल्याने त्याच्या विरुध्द सपोनि  दिपक लंके यांच्या फिर्यादीवरुन कलम 4/24 आर्म एक्ट 1951 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उप विभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांनी दिली आहे.तसेच कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहचविनाऱ्यावर कडक कार्यवाई करण्यात येईल.असेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *