गेवराई दि 13 ( वार्ताहार ) तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील पांढरवाडी या ठिकाणी खून का बदला खून घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी एकूण सात जणांविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला होता तसेच ही घटना ( दि 3 सप्टेंबर ) रोजी घडली होती दोन दिवसांतच तलवाडा पोलिसांनी मुख्य सुत्रधार माऊली भावले व त्यांचा भाऊ याला पिंपरी चिंचवड परिसरातून अटक केली होती यानंतर आज ( दि 13 सप्टेंबर ) रोजी या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना तलवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,वडिलांची अटकपुर्व जामिन साठी कारणीभूत ठरलेला मुलगा बालाजी घरबूडे ( वय 29 वर्ष ) याला गावातीलच सात जणांनी मिळून चाकूने भोकसून जिवे ठार मारल्याची घटना उघडकीस आली होती तसेच या घटनेला मागची खूनाची पार्श्वभूमी होती तसेच या घटनेनं संपुर्ण बीड जिल्हा हादरला होता तसेच या प्रकरणातील फरार आरोपी हे दोघेजण एका सिंमेंटच्या ट्रकमध्ये बसून हैदराबाद कडे जात असल्याची माहिती तलवाडा पोलिसांना मिळाली तसेच तलवाडा पोलिसांनी भूम येथील पोलिसांची मदत घेऊन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत अंनता अश्रूबा भावले ( वय 35 वर्ष ) व कल्याण वासुदेव भावले ( वय 32 वर्ष ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणातील मुख्य सुत्रधार अमोल भावले व त्यांचा भाऊ यांना आज गेवराईच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू,सपोनि सोमनाथ नरके,यांच्या मार्ग दर्शनाखाली पोउपनि स्वप्नील कोळी,पोउपनि महेश जाधव,पोहे भगवान खाडे व ईतर यांनी केली आहे.