अवैध दारू विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – नीरज राजगूरू
गेवराई दि 10 ( वार्ताहार ) सध्या गणेश उत्सव सुरू आहेत त्या अंनूषगाने अनेक गावांत अवैध दारू विक्री करणाऱ्या अश्या लोकांविरूद्ध कायदेशीर कार्यवाई करणार असल्याचे उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांनी सांगितले असून गेवराई शहरातून मोटार सायकलवर देशी विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या एकावर उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांच्या पथकाने कार्यवाई केली आहे तसेच ही कार्यवाई ( आज दि 10 सप्टेंबर ) रोजी पाच च्या दरम्यान केली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, गेवराई शहरातून बसस्थानक परिसरातून एक ईसम बजाज सीटी 100 या मोटार सायकल वरूण अवैध देशी दारू घेऊन जात असल्याची माहिती गेवराईचे उपविभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांना गूप्त बातमीदाराने दिली त्या अंनूषगाने त्यांनी सदर ठिकाणी आपल्या पथकातील कर्मचारी यांना पाठवून सदर ईसमावर कार्यवाई करण्याचे आदेश दिले तसेच या दारू घेऊन जानारा व्यक्ती यांच्या विरोधात गेवराई पोलिसांत गून्हा दाखल केला असून या कार्यवाईत 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून गणेश उत्सवाच्या काळात अश्या घटना घडू नयेत तसेच पोलिस प्रशासन याबाबद दक्ष असून असे कृत्य करणाऱ्या ईसमांची गय केली जाणार नाही असे गेवराईचे उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांनी सांगितले आहे.