January 22, 2025

पाढंरवाडी खून का बदला खून प्रकरणी मुख्य सुत्रधार अमोल भावले सह एकला अटक

तलवाडा पोलिसांनी पुण्यात ठोकल्या बेड्या

 

गेवराई दि 6 ( वार्ताहार ) तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील पांढरवाडी खून का बदला खूून या घटनेने बीड जिल्हा हादरला होता तसेच बालाजी घरबूडे हत्याकांडातील मुख्य सुत्राधार अमोल भावले व त्यांचा भाऊ उमाजी भावले या दोघांना तलवाडा पोलिसांनी पिंपरी चिंचवड पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी अशी की,वडिलाची अटक पुर्व जामिन केल्याचा राग मनात धरून तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील पांढरवाडी या ठिकाणी गावाजवळ बालाजी घरबूडे( वय वर्ष ) यांचा निर्घून हत्या करण्यात आली होती या प्रकरणी तलवाडा पोलिसांत सहा जणाविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला तसेच पोलिस अधीक्षक यांच्या कार्यलया समोर नातेवाईक यांनी अक्रोश केला होता ही घटना ( दि 3 सप्टेंबर ) रोजी चार च्या दरम्यान घडली होती तलवाडा पोलिसांनी सदर घटनेतील सुत्रधार अमोल भावले व त्यांचा भाऊ उमाजी भावले यांना पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातून रात्री दोन वाजता बेड्या ठोकल्या आहेत सदरची कार्यवाई बीड पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर,उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू,यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोमनाथ नरके,पोउपनि कोळी,पोउपनि नेवरे,पोह खाडे,पोह जावळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *