तहसिलदार हल्ला प्रकरणातील मुख्य सुत्रधार जावेद पठाण च्या मुसक्या आवळल्या

उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांची माहिती

गेवराई दि 5 ( वार्ताहार ) गत दोन महिण्यापुर्वी गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे हे गस्त घालत असतांना त्यांनी एक हायवा पकडला तसेच हा हायवा सोडून घेण्यासाठी तहसिलदार यांच्या पथकावर जावेद पठाण यांने हल्ला चढविला होता तसेच त्यांने बीड जिल्हा सत्र न्यायलयात अटकपुर्व जामिन साठी अर्ज केला होता परंतू त्यांचा जामिन फेटाळला व (दि 4 सप्टेंबर ) रोजी जावेद पठाण च्या मुसक्या गेवराई पोलिसांनी आवळल्या असल्याची माहिती उप विभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांनी दिली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की, (दि 25 जून ) रोजी रात्री अकराच्या दरम्यान गेवराईचे तहसिलदार संदिप खोमणे हे आपल्या पथकासोबत वाळू तस्करी रोखण्याच्या उद्देशाने गस्त घालत असतांना गेवराई बायपास दत्तराज पार्क जवळ एक हायवा कार्यवाईसाठी अडविला परंतू जावेद पठाण यांने आपल्या बारा ते तेरा साथीदार यांना सोबत घेऊन तहसिलदार संदिप खोमणे यांच्यावर जिवघेन्ना हल्ला चढविला तसेच या प्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला होता तसेच जावेद पठाण हा फरारच होता त्याने बीड जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज केला होता परंतू त्यांचा जामिन  न्यायालयाने फेटाळला होता  ( दि 4 सप्टेंबर ) रोजी बीड रोडवर जावेद पठाण आहे अशी माहिती गूप्त बातमी दाराने गेवराई चे उपविभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांना दिली त्यांनी मोठ्या शिताफिने जावेद पठाण ला अटक करण्याच्या सुचना गेवराई पोलिसांना दिल्या त्यावरून गेवराई पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत तसेच त्याला गेवराईच्या न्यायालयात हजर ही करण्यात आले तसेच त्याकडून एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ,एक हायवा,दोन लाकडी दांडे, दोन लोखंडी रॉड,जप्त करण्यात आले आहेत तसेच त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे तसेच या प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कार्यवाई करून शासन होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे उप विभागिय पोलिस अधीकारी नीरज राजगूरू यांनी सांगितले आहे.

या संबंधी व्हिडीओ बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *