बापाची अटकपुर्व जामिन करण्यासाठी मुलाने प्रयत्न केले म्हणून केला खून
पाढंरवाडी खून का बदला खून प्रकरणी सहा जणाविरूद्ध गून्हा दाखल
गेवराई दि 4 ( वार्ताहार ) तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील पाढंरवाडी शिवारात खून का बदला खून ही घटना समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली तसेच तलवाडा पोलिसांनी गून्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली असल्याने बीड पोलिस अधीक्षक यांच्या कार्यलयासमोर नातेवाई यांनी अक्रोश केला या प्रकरणी आता सहा जणाविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गूरनं,15/2024 या दाखल गून्ह्यात मयत तरूण यांचे वडिल भगवान घरबूडे यांना आरोपी केले होते तसेच हा गून्हा अमोल सुखदेव भावले यांनी दाखल केला होता अमोलची 2 वर्षाची मुलगी तनूजा आणि 13 महिण्याचा मुलगा किशोर यांना उंदिर मारणाचे औषध देऊन ठार मारले होते तसेच या गून्ह्यात अमोल भावले यांची भावजई तसेच शेजारी राहणारी महिला हीने हा गून्हा करण्यास चार लाख रूपये देते म्हणून प्रोत्साहीत केले होते परंतू यांच्यात वाद झाले आणि या प्रकरणाला वाचा फूटली याच प्रकरणात भगवान घरबूडे यांचा देखील सहभाग होता परंतू ते फरार होते यांची अटक पुर्ण जामिन करण्यासाठी मुलगा बालाजी भगवान घरबूडे हा प्रयत्न करत होता तसेच त्यांच्या प्रयत्नानां यश ही आले आणि वडिलांची अटक पुर्व जामिन झाली या घटनेचा राग मनात धरून ( दि 3 सप्टेंबर ) रोजी बालाजी यांची गावाजळ जात असताना अमोल भावले व त्यांच्या पाच साथीदाराने मिळून बालाजीचा काटा काढला काही क्षणांतच बालाजीचा घटना स्तळावरच मृत्यू झाला तसेच तलवाडा पोलिसांनी गून्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली तसेच हे पिडीत कुटूंब पोलिस अधीक्षक यांच्या कार्यलया समोर अक्रोश करत होते जिल्ह्यात या घटनेमुळे खळबळ माजली आहे तसेच तलवाडा पोलिसांत अमोल सुखदेव भावले सह पाच जणांविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपी फरार आहेत पोलिसांची पथके आरोपीच्या शोधार्थ रवाना झालेली आहेत व पुढील तपास तलवाडा पोलिस करत आहेत.
यासंबंधी व्हिडीओ बातमी पाहण्यासाठी खाली दिलेले लिंक वर क्लिक करा